ETV Bharat / sitara

सुझान खानने केले हृतिक रोशनची कथित प्रेमिका सबा आझादचे कौतुक

हृतिक रोशनची तथाकथित प्रेमिका सबा आझादचे त्याची माजी पत्नी सुझान खानने प्रशंसा केली आहे. सोशल मीडियावर सुझानने मुंबईतील एका कार्यक्रमात हजेरी लावल्यानंतर सबा हिचे कौतुक केले.

सोशल मीडियावर सबाची प्रतिक्रिया
सोशल मीडियावर सबाची प्रतिक्रिया
author img

By

Published : Feb 16, 2022, 5:59 PM IST

मुंबई - अभिनेता हृतिक रोशनची माजी पत्नी सुझान खानने मुंबईतील एका कार्यक्रमात सबा आझादच्या अभिनयाबद्दल कौतुकाचा वर्षाव केला आहे. हृतिक सबाला डेट करत असल्याची अफवा आहे. सबा ही एक अभिनेत्री, थिएटर दिग्दर्शक आणि संगीतकार आहे. डिनर डेटवर एकत्र दिसल्यानंतर क्रिश स्टार हृतिक आणि सबाचा कथित प्रणय गेल्या महिन्याच्या उत्तरार्धापासून चर्चेत आला आहे.

सुझान खानने केले सबा आझादचे कौतुक

लग्नाच्या 14 वर्षांनंतर 2014 मध्ये हृतिक आणि सुझान वेगळे झाले होते. परंतु या दोघांमध्ये मजबूत बंध कायम आहेत. दोघे आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. सुझान कथितरित्या अर्सलान गोनीला डेट करत असल्याची चर्चा होत असताना हृतिकला सबामध्ये प्रेम असल्याचे दिसते. सबाच्या प्रतिभेचे सुझानने कौतुक केले आहे.

सोशल मीडियावर सबाची प्रतिक्रिया
सोशल मीडियावर सबाची प्रतिक्रिया

मुंबईतील सोहो हाऊसमधील कार्यक्रमात सबाच्या कामगिरीने प्रभावित झाल्यानंतर सुझानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तिचे कौतुक केले आहे. सबाचा फोटो शेअर करताना सुझानने लिहिले, "किती सुंदर संध्याकाळ ..! तू खूप छान आणि अत्यंत प्रतिभावान आहेस. " सबानेही सुझानच्या या प्रेमळ कौतुकाला प्रतिक्रिया देत लिहिलंय, "धन्यवाद माय सुझी, काल रात्री तू तिथे होतीस म्हणून खूप आनंद झाला."

हृतिक आणि सबा दोनदा एकत्र दिसले आहेत पण ते त्यांच्यातील नात्याबाबत मौन बाळगून आहेत.

हेही वाचा - सुझानने हृतिक रोशनला म्हटले, ''जगातील सर्वोत्तम बाबा''

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.