ETV Bharat / sitara

सुष्मिता सेनसोबत पुन्हा दिसला रोहमन शॉल, कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी चाहत्यांची गर्दी - सुष्मिता सेन न्यूज

काल रात्री सुष्मिता सेन तिचा माजी प्रियकर रोहमन शॉलसोबत मुंबईतील एका आलिशान रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसली. दोघेही विभक्त झाल्यानंतर पुन्हा एकत्र दिसल्याने मनोरंजन जगतात चर्चेला उधाण आले आहे.

सुष्मिता सेनसोबत रोहमन शॉल
सुष्मिता सेनसोबत रोहमन शॉल
author img

By

Published : Mar 22, 2022, 3:11 PM IST

मुंबई - सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल हे जोडपे सोमवारी मुंबईत एकत्र दिसले. काल रात्री हे दोघे जेवणासाठी बाहेर पडले होते. सुष्मिताची धाकटी मुलगी अलिसा सेन हिच्यासोबत, सुष्मिता आणि रोहमनने हौशी फोटोग्राफर्स आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. दोघेही कारपर्यंत पोहचत असताना मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

जेव्हा सुष्मिताने सोशल मीडिया पोस्टमध्ये रोहमनपासून वेगळे होण्याची घोषणा केली तेव्हा तिने सांगितले होते की त्यांच्यातील नाते संपले आहे, परंतु मैत्री कायम राहील. तिच्या शब्दांवर खरे राहून, सुष्मिता काल रात्री तिच्या माजी जोडीदारासोबत एका आलिशान रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसली. डेनिम शर्ट आणि काळ्या पँटमध्ये हे जोडपे दिसत होते.

सुष्मिता आणि रोहमनच्या एकत्र दिसण्याने रेस्टॉरंटबाहेर एकच खळबळ उडाली. पापाराझी त्यांना एकत्र क्लिक करण्यास उत्सुक असताना, चाहते सुष्मितासोबत सेल्फी घेण्यासाठी उत्सुक होते. जेव्हा रोहमनने पाहिले की गर्दी सुष्मिताच्या खूप जवळ येत आहे, तेव्हा त्याने तिच्याभोवती आपले हात ठेवले आणि तिला कारपर्यंत नेले. रोहमनचे हे शौर्यपूर्ण हावभाव इंटरनेटवर प्रेक्षकांची मने जिंकत आहेत.

सुष्मिताने गेल्या डिसेंबरमध्ये रोहमनपासून ब्रेकअपची घोषणा केली होती. या दोघांनी 2018 मध्ये डेटिंगला सुरुवात केली आणि त्याच वर्षी शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत पहिल्यांदा एकत्र दिसले. ब्रेकअपची घोषणा करताना सुष्मिताने लिहिले होते की, "आम्ही मित्र म्हणून सुरुवात केली होती, आम्ही मित्रच राहिलो!! नातं फार काळ टिकलं नाही तरी प्रेम कायम आहे!!" त्यांच्या अलीकडच्या भेटीवरुन असे दिसते की पूर्वीचे प्रेमी अजूनही एकमेकांशी मजबूत नाते ठेवून आहेत.

हेही वाचा - मिस युनिव्हर्स 2021 हरनाज संधूच्या वेलकम पार्टीत सेलेब्रिटींची हजेरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.