मुंबई - अभिनेत्री सुष्मिता सेनने तिचा साथीदार रोहमन शावल याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर त्याच्यासोबतचे दोन जवळकीचे फोटो शेअर करुन त्याला शुभेच्छा दिल्या. सुश्मिता आणि रोहमन २०१८ पासून डेटिंग करीत आहेत.
रोहमन शावल याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सोमवारी सकाळी सुष्मिताने इंस्टाग्रामवर प्रेमळ पोस्ट शेअर केली आहे.
सुष्मिताने तिच्या आयुष्यातील खास गोष्टी कधीही लपवून ठेवलेल्या नाहीत. माजी ब्युटी क्वीन असलेल्या या सौंदर्यवती अभिनेत्रीने सोशल मीडियावर प्रियकरासोबत घालवलेल्या नाजुक क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. एकमेकांचे वाढदिवस, सुट्ट्या आणि दररोजच्या जीवनातील सुंदर क्षण यांचे फोटो ती नेहमी चाहत्यांसाठी शेअर करीत असते.
हेही वाचा -रिचा चढ्ढाचा "मॅडम चीफ मिनीस्टर" चित्रपट २२ जानेवारीला होणार थिएटरमध्ये रिलीज
२०१५ मध्ये बंगाली चित्रपट 'निर्बाक'मध्ये दिसल्यानंतर ती चित्रपट सृष्टीतून गायब झाली होती. गेल्या वर्षी तिने 'आर्या' या वेबसिरीजमधून आपले पुनरागमन केले होते.
हेही वाचा - अभिनेते नव्हे, धूम-४ मध्ये दीपिका साकारणार मुख्य खलनायकाची भूमिका?