मुंबई - सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने मानसिक आरोग्याबद्दल बोलण्यास भाग पाडले असल्याचे मत अभिनेत्री सुश्मिता सेनने व्यक्त केले आहे. मानसिक स्वास्थाबद्दल बोलणे खूप आवश्यक असल्याचे ती म्हणते.
सुशांत सिंह राजपूत गेल्या रविवारी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात पंख्याला लटकलेला आढळला होता. त्याच्या या कृतीमुळे चाहते हादरले आहेत. काही महिन्यापासून तो डिप्रेशनमध्ये होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. सुष्मिता म्हणते, ''सुशांतसारखे अनेक तरुण आम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत की, दुसऱ्याला दोष देण्यापूर्वी आपल्या गोष्टींची जबाबदारी घेतली पाहिजे.''
हेही वाचा - करण जोहरवर बहिष्काराची सोशल मीडियावर मागणी, #जस्टिसफॉरसुशांत हॅशटॅग ट्रेंड
सुष्मिता पुढे म्हणाली, ''मी जेव्हा यूट्यूब चॅनल सुरू केले तेव्हा एक सूचना पुन्हा पुन्हा येत राहिली. प्रत्येकजण मला मानसिक आरोग्याबद्दल बोलायला सांगत होता. ही गोष्ट सुशांतच्या बातमीच्या अगोदरची आहे. मी विचार करीत राहिले की, ठिक आहे मी काही करेन. मी ठरवले होते की ब्लॉग लिहीन, परंतु मी सुरू करू शकले नाही. जेव्हा मी सुशांतची बातमी ऐकली तेव्हापासून मी सलग लिहायला सुरूवात केली आहे.''
हेही वाचा - सुशांत आत्महत्या प्रकरण: तक्रारीनंतर एकता म्हणाली, ''मीच सुशांतला लॉन्च केले होते''
आपल्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना अत्यंत कडक शब्दात सुष्मिताने हार न मानण्याबद्दल सांगितले. शेवटपर्यंत लढत राहण्याचा सल्ला देत तिने गरज पडल्यास मदत घेण्याचेही सांगितले. सुष्मिताने आपल्या पोस्टमध्ये एक फोटो शेअर करीत लिहिले आहे, 'प्रोटेक्ट युवर पीस', म्हणजे तुमच्या शांततेचे रक्षण करा. अशा प्रकारे सुशांतच्या निधनाने पुन्हा एकदा मानसिक आरोग्य आणि भावना व्यक्त करण्याचे महत्त्व या विषयाला चर्चेत आणले आहे.
कामाच्या पातळीवर सुष्मिता सेन हिची 'आर्या' ही वेब सिरीज १९ जूनपासून दिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहेत.