मुंबई - प्रसिद्ध गायक आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य अनूप जलोटा यांनी म्हटलंय की, हा राष्ट्रीय मुद्दा नसला तरी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनाला राष्ट्रीय मुद्दा म्हणून पाहिले जात आहे. त्यांना वाटते की ही बाब लोकांच्या भावनांशी संबंधित आहे आणि लोकांनी कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा केली पाहिजे.
जलोटा यांनी सांगितले, "सुशांतसिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांचे प्रकरण हा राष्ट्रीय मुद्दा नसून तो एक राष्ट्रीय मुद्दा म्हणून सादर केला जात आहे. हे एक अभिनेता आणि त्याच्या मैत्रिणीबद्दल आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा नाही, ज्याला आपण प्राथमिकता देऊन उचलला पाहिजे. लोकांच्या संवेदनांशी संबंधित ही बाब आहे. "
भजन सम्राट म्हणून प्रसिद्ध असलेले जलोटा 2004 मध्ये भाजपमध्ये दाखल झाले होते. ते म्हणाले, "तो (सुशांतसिंह राजपूत) एक चांगला अभिनेता होता. मी त्याच्या कामाचे कौतुक करतो, मी त्याला भेटलो आहे, परंतु त्याच्या मृत्यूला राष्ट्रीय मुद्दा बनवू नये. लवकरात लवकर त्याला न्याय मिळाला पाहिजे."
अनुप जलोटा आगामी 'वो मेरी स्टूडेंट है' या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्यासोबत बिग बॉसमध्ये त्यांच्यासोबत राहिलेली जसलीन मठारू काम करीत आहे. या आठवड्यात जलोटाचा एक फोटो व्हायरल झाला असून त्यांनी लग्नाचा पोशाख घातला होता. यामुळे दोघांचे लग्न होणार आहे की काय, अशी अटकळ निर्माण झाली होती. त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे नंतर उघडकीस आले.