नवी दिल्ली - बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणात रिया चक्रवर्ती सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. याचिकेत हा खटला बिहारमधून मुंबई येथे वर्ग करण्यात यावा असे तिने म्हटले आहे. यापूर्वी सुशांतसिंग राजपूतचे वडील केके सिंह यांनी मंगळवारी पाटणातील राजीव नगर पोलिस ठाण्यात रिया चक्रवर्ती हिच्याविरूद्ध एफआयआर दाखल केली होती.
सुशांत आत्महत्या प्रकरणाबाबत सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी पाटणा पोलिसांनी अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
केके सिंह यांच्या एफआयआरनुसार रिया चक्रवर्ती, तिचे कुटुंब इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी आणि इतरांना आरोपी म्हणून संबोधण्यात आले आहे. एफआयआर कॉपीनुसार केके सिंह यांनी फसवणूक, बेईमानी, ओलीस ठेवून आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. एफआयआरमध्ये त्यांनी सुशांत आणि रियाच्या जीवनाबद्दल बरीच माहिती लिहिलेली आहे. 8 पानांच्या एफआयआर कॉपीनंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर कलम ३४१, ३८०, ४०६, ४२०, ३०६ आणि ३४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटणा पोलिसांनी 241/20 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
हेही वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : रिया चक्रवर्तीची पाटण्यातही होऊ शकते चौकशी?
केके सिंह यांनी लिहिले की, ''माझा मुलगा सुशांत मे 2019 पर्यंत अभिनय जगात उच्च स्थानांवर होता. दरम्यान, रिया चक्रवर्ती नावाच्या एका मुलीने तिच्या कुटूंबियांसह आणि इतरांसह, एका सुनियोजित कटात माझा मुलगा सुशांत सिंह याच्या आयुष्यात हस्तक्षेप वाढविण्यास सुरुवात केली. जेणेकरून ती सुशांतसिंहच्या चांगल्या संपर्कांचा फायदा घेऊन स्वत: ला अभिनय क्षेत्रातच प्रस्थापित करेल आणि सुशांत सिंहच्या कोट्यवधी रुपयांवर हात साफ करू शकेल.''
''माझा मुलगा सुशांतला फिल्म लाइन सोडून केरळमध्ये सेंद्रिय शेतीचा व्यवसाय करायचा होता, त्याचा मित्र महेश त्याच्याबरोबर जाण्यास तयार होता. त्यानंतर तू कुठेही जाणार नाहीस असा विरोध रियाने केला. जर तू माझे ऐकत नसशील तर मी तुझा वैद्यकीय अहवाल मीडियात देईन आणि सर्वांना तू वेडा आहेस हे सांगेन.''
"जेव्हा रियाला असे वाटले की सुशांत तिचे ऐकत नाही आणि त्याचा बँक बॅलन्सही खूप कमी आहे. तर 08/06/2020 रोजी रियाने सुशांतच्या घरातून रोकड, दागदागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि त्याची महत्वाची कागदपत्रे घेऊन गेली. इतकेच नाही तर तिने सुशांतचा फोन नंबर त्याच्या फोनमध्ये ब्लॉक केला. यानंतर सुशांत सिंगने माझ्या मुलीला फोन करून सांगितले की रिया मला कुठेतरी अडकवेल. ती मला धमकावते. जर तू माझे ऐकत नसशील तर मी तुझा वैद्यकीय अहवाल मीडियात देईन आणि सर्वांना तू वेडा आहेस हे सांगेन. तुला पुढे कोणतेही काम मिळणार नाही आणि तू बरबाद होशील."
हेही वाचा - महेश भट्ट: रियाला कधीही सुशांतला सोडण्यास सांगितले नव्हते
''यानंतर एका रात्री सुशांतने नेमलेल्या दिशा सालियान हिने आत्महत्या केली. ही बातमी मीडियामध्ये सुरू होती. यामुळे माझा मुलगा खूप घाबरला होता. त्याने रियाशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु संपर्क साधू शकला नाही कारण रियाने माझ्या मुलाचा फोन नंबर ब्लॉक केला होता. दिशाच्या आत्महत्येसाठी रिया माझ्या मुलाला दोषी ठरवू शकेल या भितीने तो घाबरला होता.''
"रियाने माझा मुलगा सुशांत सिंगला उपचाराच्या बहाण्याने मुंबईत तिच्या घरी घेऊन गेली आणि तेथे त्याला ओव्हरडोस औषधे दिली गेली. त्यावेळी रियाने सर्वांना सांगितले होते की सुशांतला डेंग्यू झाला आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर सुशांतला कधीही डेंग्यू झाला नव्हता."
"सुशांतचा फोन रिया आणि तिच्या कुटुंबियांनी आपल्याकडे ठेवला होता. सुशांत सिंगला चित्रपटाच्या ऑफर येत होत्या तेव्हा रिया अशी अट ठेवायची की जर तिला सुशांतची हिरॉईन म्हणून घेत असाल तरच सुशांत चित्रपटात काम करु शकेल. रियाने सुशांतच्या सर्व विश्वासू कर्मचार्यांना रियाने बदलून टाकले आणि त्यांच्या जागी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले. सर्व क्रेडिट कार्ड, बँक खाती रिया आणि तिच्या कुटुंबाच्या नियंत्रणाखाली होती. सुशांतला कुटुंबापासून पूर्णपणे दूर केले होते."
"मी माझ्या घरी पाटणा बिहारमध्ये राहत असताना माझा मुलगा सुशांतशी बर्याच वेळा बोलण्याचा प्रयत्न केला. पण रिया, तिचे कुटुंबिय आणि सहकारी यांनी नेहमीच माझे सर्व प्रयत्न फोल केले आणि त्याला पाटण्याला येऊ दिले नाही."
हेही वाचा - रिया चक्रवर्तीबद्दल नवाजुद्दीनच्या भावाने ट्विट केली 'रहस्यमय' पोस्ट
''सुशांत अस्वस्थ व्हायचा. त्याला समजवण्यासाठी माझी मुलगी अमेरिकेतून मुंबईला आली होती. आणि माझा मुलगा सुशांतसोबत तीन ते चार दिवस थांबली होती. तिने सुशांतला बरेच काही समजावून सांगितले आणि सर्व काही ठीक होईल असे प्रोत्साहन दिले होते. माझ्या मुलीला लहान मुले असल्याने ती तीन ते चार दिवसांनी परत गेली. पण ती गेल्यानंतर दोन दिवसांनी माझा मुलगा सुशांतने 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली.''
"रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन एका षडयंत्रांतर्गत माझ्या मुलाची फसवणूक केली. बराच काळ त्याला ओलिस ठेवून दबावाखाली असताना आर्थिक फायद्यासाठी त्याचा वापर केला आणि माझ्या मुलाला आत्महत्या करण्यास भाग पाडले. म्हणून गुन्हा दाखल करून तपास केला पाहिजे. माझ्या मुलाच्या बँक खात्याच्या स्टेटमेंटमध्ये असे दिसून आले आहे की, गेल्या एका वर्षात सुमारे 17 कोटी रुपये माझ्या मुलाच्या खात्यात होते, याकाळात सुमारे 15 कोटी रुपये काढून घेण्यात आले. या खात्यातून अशा खात्यात पैसे हस्तांतरित केले गेले होते ज्यातून माझ्या मुलाचा काहीच संबंध नाही.," असे सुशांतचे वडील केके सिंह यांनी म्हटले आहे.
सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याचे वडील केके सिंह यांनी शनिवारी पाटणाच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता आणि आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. आता त्याचा चुलतभाऊ नीरज सिंग यांचे विधान समोर आले आहे.
सुशांतसिंग राजपूत यांचे भाऊ आणि भाजपचे आमदार नीरजकुमार बबलू म्हणाले की, कुटुंबाच्या वतीने जे आरोप करण्यात आले आहेत त्याची चौकशी व्हावी असे आम्हाला वाटते. मुंबई पोलिस योग्य तथ्यांचा शोध घेत नाहीत, म्हणून बिहारच्या पाटणामध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ते म्हणाले की सुशांत सिंगच्या मृत्यूशी संबंधित पुरावे मिटवले जात आहेत.
याशिवाय सुशांतसिंग राजपूत यांचे वडील कृष्णा किशोर चौधरी यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे. बिहार पोलिसांची टीम मुंबईत दाखल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीम रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटूंबाची चौकशी करेल.