ETV Bharat / sitara

सुशांत सिंह राजपूतच्या 'पवित्र रिश्ता'मधील फोटो बंगाली पाठ्यपुस्तकात

सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचा पवित्र रिश्ता या टीव्ही मालिकेतील फोटोला बंगाली शालेय पाठ्यपुस्तकात स्थान मिळाले आहे. सुशांतच्या एका मित्राने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Sushant's picture
सुशांत सिंह राजपूत
author img

By

Published : May 8, 2021, 8:33 PM IST

मुंबई - दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या पदार्पणाचा टीव्ही शो पवित्र रिश्तामधील फोटोला बंगाली पाठ्यपुस्तकात स्थान मिळाले आहे. सुशांत आणि त्याची अगोदरची मैत्रिण अंकिता लोखंडेचा फोटो परिपूर्ण कुटुंब म्हणून दाखवण्यात आले आहे. सुशांतची मैत्रिण स्मिता पारेखने ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

ट्विटरवर स्मिताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सुशांत आणि अंकिताचा फोटो वंशावळ धड्यातील पाठ्य पुस्तकात वापरण्यात आला आहे. ट्विटरवर पोस्ट शेअर करताना स्मिताने लिहिले आहे की, “एका प्राथमिक पाठ्यपुस्तकात आमच्या लाडक्या सुशांतचा फोटो वडिल म्हणून दाखवण्यात आलाय. आपल्या शिक्षण बोर्डालाही वाटते की तो उत्तम होता.'' स्मिताने ही पोस्ट सुशांतची बहिण प्रियंका सिंह आणि नितू सिंह यांना टॅग केला आहे.

तिने ट्विट शेअर केल्यानंतर सुशांतच्या चाहत्यांनी टाईमलाईनवर कमेंट्सचा वर्षाव केलाय. चाहत्यांनी लिहिलंय, "यात शंका नाही एसएसआर सर्वोत्तम आहे .. आम्हाला त्याचा नेहमीच अभिमान आहे… सुशांत तू खूप स्मरणात आहेस,लव्ह यू सो मच बेटा.'' तर दुसऱ्या चाहत्यांने लिहिलंय, ''तू कायम आमच्या अंतःकरणात राहशील"

पुढील जून महिन्यात सुशांतच्या निधनाला १ वर्ष पूर्ण होईल. त्याच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय), अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) या तीन केंद्रीय संस्थांकडून केली जात आहे.

हेही वाचा - कंगनाला कोरोनाची लागण, म्हणाली- मी कोरोनाला नष्ट करेन, आपण याचा सामना करु

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.