मुंबई - सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर अनेक चाहते आणि प्रशंसकांकडून सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. अभिनेत्री कंगना रनौत, शेखर सुमन, रिया चक्रवर्ती हेदेखील या प्रकरणात सीबीआय चौकशीसाठी आवाज उठवताना दिसले आहेत. आता अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनीदेखील ही मागणी उचलून धरली आहे.
एका अग्रगण्य पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेत्याने सीबीआय चौकशीचे आवाहन केले आणि सांगितले की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. ते पुढे म्हणाले की सुशांतच्या मृत्यूमागील सत्य शोधून काढले पाहिजे.
दरम्यान, कंगना रनौतने सुशांत मृत्यूप्रकरणी आपला जवाब नोंदवायची असल्याचे उघड केले, परंतु मुंबई पोलीस त्यास प्रतिसाद देत नाहीत. अलीकडेच अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणात कंगनाला तिचे निवेदन नोंदवण्यासाठी लवकरच समन्स बजावतील.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत तपासात चित्रपट समीक्षक राजीव मसंद, दिग्दर्शक-निर्माता संजय लीला भन्साळी, आणि चित्रपट निर्माते आदित्य चोप्रा यांच्यासह 39 जणांची विधाने नोंदविण्यात आली आहेत.
हेही वाचा -धमकी देणाऱ्या ट्रोलर्स विरुध्द न्यायालयात जाण्याच्या तयारीत करण जोहर
आत्महत्येच्या तपासासंदर्भात तीन मानसोपचारतज्ज्ञ आणि एका सायको थेरपिस्टची विधाने नोंदविण्यात आली असल्याचे मुंबई पोलिसांनी नुकतेच सांगितले होते. सुशांतसिंह राजपूत १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी अहवालाच्या आधारे स्पष्ट केले होते.