ETV Bharat / sitara

सुशांतसिंह २०२१ मध्ये करणार होता विवाह, मात्र कोणाशी..? - अंकिता लोखंडे

सुशांतसिंह राजपूत २०२१ च्या फेब्रुवारी मार्च महिन्यात लग्न करणार होता, हा खुलासा त्याचे वडील के के सिंह यांनी केला आहे. त्याच्या जीवनात अंकिता लोखंडे आहे हे माहिती होते. मात्र तो कोणाशी विवाह करणार हे सांगितले नसल्याचे ते म्हणाले.

Sushant Singh Rajput
सुशांतसिंह राजपूत
author img

By

Published : Jun 26, 2020, 12:53 PM IST

पाटणा - अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे वडील के. के. सिंह यांनी आपल्या मुलाच्या निधनानंतर काही गोष्टींबद्दल चर्चा केली आहे. यामध्ये त्यांनी सुशांतच्या विवाहाबद्दलही खुलासा केला आहे. सुशांत २०२१ मध्ये विवाह करणार होता, अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली. मात्र, तत्पूर्वी सुशांतने वयाच्या ३४ व्या वर्षी आत्महत्या केली. तो डिप्रेशनच्या आजाराने तो त्रस्त झाला होता, अशी माहिती समोर येत आहे.

सुशांतच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितले की सुशांत लहानपणी प्रत्येक गोष्टीवर मोकळेपणाने बोलायचा. मात्र तो जसजसा मोठा होत गेला तसा तो एकटा स्वतःत मश्गुल राहायला लागला होता. ''सुरुवातीला तो सगळे बोलायचा पण शेवटी काय झाले, ते त्याने नाही सांगितले.'' सुशांतची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेबद्दल बोलताना ते म्हणाले की, ''मुंबईसह ती पाटण्यातही सर्वांना भेटायला आली होती. सुशांत आणि अंकिताची जोडी 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून हिट झाली होती आणि सहा वर्षे ते एकत्र राहात होते. सुशांतच्या निधनानंतर अंकिता त्याच्या मुंबईतील घरामध्ये जाताना दिसली होती.

सुशांतच्या वडिलांनी खुलासा केला की, २०२१ मध्ये सुशांत लग्न करणार होता. वडिलांच्यादृष्टीने सुशांतच्या जीवनात एकच मुलगी होती ती म्हणजे अंकिता. त्यांना रिया चक्रवर्तीबद्दल काहीच माहिती नव्हते. त्यांनी हेही सांगितले की सुशांत म्हणाला होता तो कृती सेनॉनला भेटला आहे. सुशांतच्या निधनानंतर कृतीने सुशांतबद्दल पोस्ट लिहून खूप कौतुक केले होते.

लग्नाच्या विषयावर सुशांत आणि त्याच्या वडिलांचे बोलणे झाले होते. त्यावेळी तो म्हणाला होता की लग्नाचा विचार सुरू आहे. मात्र, कोरोनामध्ये तर नाही. त्यानंतर एक चित्रपट येतोय तो करेन, त्यानंतर फेब्रुवारी मार्चमध्ये पाहूयात, हीच त्याच्यासोबत शेवटची चर्चा झाली असल्याचे सुशांतलच्या वडिलांनी सांगितले.

हेही वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : पोलिसांनी नोंदवला कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा जवाब

कोणासोबत लग्न करणार होता याबद्दल सुशांत काहीही बोलला नसल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. ते सुशांतला म्हणाले होते, ''तू तुझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न कर, कारण तुला तिच्यासोबत आयुष्य घालवायचे आहे.''

गेल्या रविवारी सुशांतच्या कुटुंबियांनी प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. यात भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह, अभिनेता-राजनेता मनोज तिवारी यांच्यासह अनेक कलाकार सहभागी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.