मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेण्ड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीवर खळबळजनक आरोप केला आहे. रियाने छळ केल्यामुळे सुशांत दु: खी होता, अशी माहिती अंकिताने बिहार पोलिसांना दिल्याचे समोर आले आहे. अंकिताच्या आरोपानंतर सुशांतच्या मृत्यू प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले आहे. तसेच मंगळवारी सुशांतसिंहचे वडिल के. के. सिंह यांनी पाटण्याच्या राजीव नगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली. यात त्यांनी सुशांतच्या आत्महत्येला रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
काही दिवसांपूर्वी अंकिताने पाटण्यात सुशांतच्या कुटुंबाला भेट दिली होती. तेव्हा अंकिताने बिहार पोलिसांना सांगतिले होते, की 2019मध्ये 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या हिंदी सिनेमाच्या रिलीजवेळी सुशांतशी भेट झाली होती. तेव्हा गप्पांमध्ये सुशांतने त्याची गर्लफ्रेण्ड रिया त्याला त्रास देत असल्याचे सांगितले होते.
रिया त्याला त्रास देत असल्याने तो रिलेशनशिपमध्ये खूप दु: खी होता. त्यामुळे त्याला रियासोबतचे रिलेशनशिप संपवायचे होते, असे अंकिताने सांगितले. याबाबत सुशांतसोबत केलेली चॅटही तीने बिहार पोलिसांसोबत शेअर केले.
सुशांत सिंह राजपूत याने रविवारी 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला.