ETV Bharat / sitara

'पवित्र रिश्ता'च्या मानवचा 'धोनी'पर्यंतचा प्रवास

author img

By

Published : Jun 14, 2020, 3:45 PM IST

Updated : Jun 14, 2020, 4:31 PM IST

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. सुशांतने 'कायपो चे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने शुद्ध देसी रोमांस, पीके, धोनी द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ, सोनचिढीया आणि छिछोरे यासारख्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या.

सुशांत सिंह राजपूत
सुशांत सिंह राजपूत

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, सुशांतच्या मॅनेजरने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येचे नेमके कारण काय असू शकते, याचा तपास सुरू आहे.

सुशांतचा जन्म बिहारच्या पाटण्यात 21 जानेवारी १९८६ झाला. सुशांतने मॅकेनिकल इंजिनियरींगचे शिक्षण पूर्ण केले होते. सुशांत सिंह राजपूतने त्याच्या करीअरची सुरुवात 'किस देश मे है मेरा दिल' या मालिकेतून केली. मात्र, 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून सुशांत घराघरात पोहोचला. ती मालिका अर्ध्यावर सोडून सुशांतने त्याची पावले मोठ्या पडद्याकडे वळवली. सुशांतने 'कायपो चे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने शुद्ध देसी रोमांस, पीके, धोनी द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ, सोनचिढीया आणि छिछोरे यासारख्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या.

पवित्र रिश्ता मालिकेदरम्यान सुशांत आणि त्याची सहकलाकार अंकिता लोखंडे एकमेकांच्या प्रेमात पडले. सुशांत आणि अंकिता सहा वर्षे नात्यात होते. मात्र, त्यानंतर त्यांच्यात खटके उडायला लागले आणि ते वेगळे झाले.

सुशांतला 'काय पो चे' चित्रपटातील पदार्पणासाठी फिल्मफेयर अवार्ड मिळाला होता. तर धोनी द अनटोल्ड स्टोरीसाठी फिल्मफेयरसाठी नामांकित करण्यात आले होते. तसेच भारत सरकारच्या निती आयोगाने वूमन इंटरप्रेन्योरशिप प्लॅटफॉर्मचा प्रसार करण्यासाठी सुशांतची निवड केली होती.

सुशांतने आर. माधवनसोबत चंदा मामा दूर के हा चित्रपट साईन केला होता. तसेच मुकेश छाब्रा यांचा द फॉल्ट इन अवर स्टार या पुस्तकावर आधारीत दिल बेचारा चित्रपट साईन केला होता. यासह इतर काही चित्रपटांमध्ये तो काम करणार होता.

Last Updated : Jun 14, 2020, 4:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.