ETV Bharat / sitara

सुशांतच्या चुलत भावाची संजय राऊतांना नोटीस; '48 तासात माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाई करू' - sanjay raut on sushant singh death case

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांना सुशांतचा चुलत भाऊ व भाजपचे आमदार नीरज कुमार सिंह यांनी कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Aug 12, 2020, 3:02 PM IST

मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांना सुशांतचा चुलत भाऊ व भाजपचे आमदार नीरज कुमार सिंह यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. राऊत यांनी 48 तासात माफी मागावी, अन्यथा मानहानीचा खटला दाखल होईल, असे त्यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे.

सुशांतच्या वडिलांचे पुन्हा लग्न करायचे होते, त्यामुळे सुशांत नाराज होता, असे राऊत यांनी म्हटले होते. त्यावर ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. संजय राऊतांनी रोखठोकमधून सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबाविषयी भाष्य केले होते.

एक गोष्ट सत्य आहे की, सुशांतचे त्याच्या वडिलांशी संबंध चांगले नव्हते. मुंबई हाच त्याचा आशियाना होता. या सर्व काळात सुशांत हा वडिलांना व इतर नातेवाईकांना किती वेळा भेटला? सुशांत किती वेळ पाटण्याला गेला? ते समोर येऊ द्या, असेही ते म्हणाले होते. दरम्यान, नोटीससंदर्भात संजय राऊत यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.