अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने ( Academy of Motion Picture Arts and Sciences ) ऑस्कर नामांकनांची यादी जाहीर ( Nominations for Oscar 2022 announced ) केली आहे. यात तमिळ कोर्टरूम ड्रामा 'जय भीम' चित्रपटाची निवड सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठी झाली नाही. त्यामुळे या चित्रपटाच्या निवडीकडे डोळे लावून बसलेल्या भारतीयांच्या पदरी निराशा आली आहे. 'जय भीम' व्यतिरिक्त प्रियदर्शनचा मल्याळम पिरियड ड्रामा 'मरक्कर: अरबीकादलिंते सिंहम' (मरक्कर: अरबी समुद्राचा सिंह) हे दोन्ही चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. या पुरस्कारच्या नामांकनांची घोषणा ट्रेसी एलिस रॉस आणि लेस्ली जॉर्डन यांनी केली.
ऑस्कर २०२२ साठी सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठी निवड झालेले १० चित्रपट पुढील प्रमाणे आहेत.
1) बेलफास्ट - लॉरा बर्विक, केनेथ ब्रानाघ, बेका कोवासिक आणि तामार थॉमस
2) कोडा - फिलिप रौसेलेट, फॅब्रिस जियानफर्मी आणि पॅट्रिक वाच्सबर्गर
3) डोन्ट लूक अप - अॅडम मॅके आणि केविन मेसिक
4) ड्राईव्ह माय कार - तेरुहिसा यामामोटो
5) ड्यून - मेरी पालक, डेनिस विलेन्यूव्ह आणि कॅल बॉयटर
6) किंग रिचर्ड - - टिम व्हाईट, ट्रेव्हर व्हाईट आणि विल स्मिथ
7) लिकोरीस पिझ्झा - सारा मर्फी, अॅडम सोमनर आणि पॉल थॉमस अँडरसन
8) नाईटमेअर अॅली - गिलेर्मो डेल टोरो, जे. माइल्स डेल आणि ब्रॅडली कूपर
9) द पॉवर ऑफ ड डॉग - जेन कॅम्पियन, तान्या सेघाचियन, एमिल शर्मन, इयान कॅनिंग आणि रॉजर फ्रॅपियर
10) वेस्ट साईड स्टोरी - स्टीव्हन स्पीलबर्ग आणि क्रिस्टी मॅकोस्को क्रेगर
रॉटन टोमॅटोजच्या संपादक जॅकलिन कोली यांनी केलेल्या ट्विटमुळे तमिळ कोर्टरूम ड्रामा 'जय भीम'ला सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठी मान्यता मिळण्याची आशा निर्माण झाली होती. तमिळ दिग्दर्शक ज्ञानवेलचा समीक्षक-प्रशंसित 'जय भीम' चित्रपटात सुर्याची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट 94 व्या अकादमी पुरस्कारांच्या नामांकनांमध्ये स्थान मिळवू शकेल, असा तर्क करण्यात आला होता.
'जय भीम' व्यतिरिक्त प्रियदर्शनचा मल्याळम पिरियड ड्रामा 'मरक्कर: अरबीकादलिंते सिंहम' (मरक्कर: अरबी समुद्राचा सिंह) हे दोन्ही चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
या चित्रपटात मोहनलाल मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपटदेखील यावर्षीच्या अकादमी पुरस्कारांसाठी पात्र असलेल्या 276 चित्रपटांच्या यादीत आहे.
27 जानेवारीपासून सुरू झालेले ऑस्कर नामांकनांसाठीचे मतदान 1 फेब्रुवारीपर्यंत चालले. 94व्या अकादमी पुरस्कारांसाठी नामांकने मंगळवारी 8 फेब्रुवारी रोजी जाहीर झाली. ९४ वा ऑस्कर पुरस्कार समारंभ रविवार 27 मार्च रोजी डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. हॉलीवूड आणि अमेरिकन नेटवर्क ABC वर आणि 200 पेक्षा जास्त जगातील प्रदेशामध्ये टीव्हीवरुन प्रसारित होणार आहे.
हेही वाचा - मायकल जॅक्सनच्या बायोपिकचे शुटिंग लायन्सगेट येथे सुरू