ETV Bharat / sitara

'सूरज पे मंगल भारी' १५ नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर रिलीजसाठी सज्ज - Diljit Dosanj

'सूरज पे मंगल भारी' हा चित्रपट येत्या १५ नोव्हेंबर रोजी भारतभर मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. या वर्षातील थिएटरमध्ये रिलीज होणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे.

'Suraj Pe Mangal Bhari
'सूरज पे मंगल भारी'
author img

By

Published : Nov 9, 2020, 7:01 PM IST

मुंबई - 'सूरज पे मंगल भारी' हा चित्रपट येत्या १५ नोव्हेंबर रोजी भारतभर मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. यात मनोज बाजपेयी, दिलजित दोसंज आणि फातिमा सना शेख एका वेगळ्याच भूमिकेत आहेत. लॉकडाऊननंतर सिनेमा प्रदर्शित होणारा होता. या वर्षातील थिएटरमध्ये रिलीज होणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. अंग्रेजी मीडियम हा चित्रपट 13 मार्च रोजी चित्रपटगृहात रिलीज झालेला शेवटचा होता.

'सूरज पे मंगल भारी' यापूर्वी 13 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. पण निर्माता झी स्टुडिओने याच्या रिलीजची नवी तारीख जाहीर केली आहे.

हेही वाचा - 'सूरज पे..'साठी मनोज बाजपेयीला तयार होण्यासाठी लागत होते ४ तास

मनोज बाजपेयी, दिलजीत दोसंज आणि फातिमा सना शेख अभिनीत या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता. त्यात नॉन स्टॉप कॉमेडीची चौफेर उधळण दिसली होती. हा चित्रपट लग्नाच्या निमित्ताने झालेल्या हेरगिरीचा आहे.

हेही वाचा - ऋषिकेश मुखर्जी, बासु चटर्जी यांच्या हास्य चित्रपटाच्या पंक्तीतील ‘सूरज पे मंगल भारी’

'सूरज पे मंगल भारी' हा चित्रपट भूतकाळातील साधेपणाचा विचार लक्षात ठेवून करण्यात आलाय. याच्या कथेत एक साधेपणा आहे. हा साधेपणा आपल्याला हृषिकेश मुखर्जी आणि बासू चटर्जी यांच्या चित्रपटांची आठवण करुन देणारा आहे. हा एक सुरेख कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.