ETV Bharat / sitara

‘देवी म्हाळसा’ सुरभी हांडे प्रेक्षकांना भेटणार ‘देवी सप्तशृंगी’ च्या रूपात! - gatha navnathachi

जय मल्हार या पौराणिक मालिकेतील म्हाळसाची भूमिका साकारणारी सुरभी हांडे ‘देवी सप्तशृंगी’ च्या रूपात प्रेक्षकांना भेटायला येणार आहे, ‘गाथा नवनाथाची’ या मालिकेतून.

‘देवी सप्तशृंगी
‘देवी सप्तशृंगी
author img

By

Published : Jun 30, 2021, 7:43 AM IST

मुंबई - काही वर्षांपूर्वी ‘जय मल्हार’ ही खंडोबाच्या जीवनावरील मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यातील खंडोबा, बाणाई आणि देवी म्हाळसा या व्यक्तिरेखा खूप प्रसिद्ध झाल्या होत्या. आणि त्या साकारल्या होत्या अनुक्रमे देवदत्त नागे, ईशा केसकर आणि सुरभी हांडे यांनी. यातील देवी म्हाळसाची भूमिका साकारणारी सुरभी हांडे ‘देवी सप्तशृंगी’ च्या रूपात प्रेक्षकांना भेटायला येणार आहे, ‘गाथा नवनाथाची’ या मालिकेतून. नाथपंथामध्ये सप्तशृंगी देवीला विशेष स्थान आहे. सप्तशृंगी देवीच्या आशीर्वादाने मच्छिन्द्रनाथांच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होत असल्याची ही महत्त्वाची घटना आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

गाथा नवनाथाची
गाथा नवनाथाची
सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर 'गाथा नवनाथांची' ही मालिका घेऊन आली आहे आणि ती प्रेक्षकांनाही आवडत आहे. कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली. तेव्हा नवनारायणांनी मनुष्यकल्याणासाठी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा 'गाथा नवनाथांची' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्या कथांपैकी आता येत्या काही भागांत सर्वश्रुत असलेली मछिंद्रनाथ आणि देवी सप्तशृंगी यांची भेट पाहायला मिळणार आहे. मालिकेत सप्तशृंगी देवीची भूमिका सुरभी हांडे ही प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार आहे.
देवी म्हाळसा
देवी म्हाळसा
सुरभी हांडेने याआधीही पौराणिक आणि सामाजिक विषय असलेल्या मालिकांमध्ये काम करून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मोठ्या विश्रांतीनंतर या भूमिकेच्या माध्यमातून ती टेलिव्हिजनवर पुनरागमन करते आहे. 'गाथा नवनाथांची', ही मालिका प्रसारित होते सोम.-शनि., संध्या. ६:३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

हेही वाचा - अतुल कसबेकरच्या कारकिर्दीतील २००वे पब्लिसिटी कॅम्पेन, ‘लूप लपेटा’ चित्रपटाचे पोस्टर!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.