ETV Bharat / sitara

सनी मुंबईला करतेय मिस, आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होताच परतणार भारतात - सनी लिओनीचे क्वारंटाइन दिवस

सनी म्हणाली, सध्या मुंबईतील घरी नसल्याचे दुःख मला आहे. मला खरेच मुंबई सोडण्याची इच्छा नव्हती. याच कारणामुळे आम्हाला इकडे येण्यासाठी एवढा कालावधी लागला. मात्र, या कठीण परिस्थितीत डॅनियलच्या आई-वडिलांसोबत राहाणे गरजेचे होते. इतरांप्रमाणेच त्यांनादेखील त्यांच्या प्रिय व्यक्तींसोबत राहायचे होते.

 sunny leone
सनी लिओनी
author img

By

Published : Jun 4, 2020, 5:24 PM IST

मुंबई - अभिनेत्री सनी लिओनी काही दिवसांपूर्वीच पती डॅनियल वेबर, मुलगी निशा, आशेर आणि नोह यांच्यासोबत लॉस एंजेलिसला गेली आहे. मात्र, आता सनीची भारतात परतण्याची इच्छा आहे. तिला आपले मुंबईतील घर सोडायचे नसून लवकरच भारतात परतायचे आहे, असे तिने म्हटले आहे.

सनी म्हणाली, सध्या मुंबईतील घरी नसल्याचे मला दुःख आहे. मला खरेच मुंबई सोडण्याची इच्छा नव्हती. याच कारणामुळे आम्हाला इकडे येण्यासाठी एवढा कालावधी लागला. मात्र, या कठीण परिस्थितीत डॅनियलच्या आई-वडिलांसोबत राहाणे गरजेचे होते. इतरांप्रमाणेच त्यांनादेखील त्यांच्या प्रिय व्यक्तींसोबत राहायचे होते.

सर्व काही सुरळीत होऊन आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी मिळताच मी मुंबईत परतणार आहे. आम्ही लवकरात लवकर भारतात परतण्याचा प्रयत्न करत आहोत, असे सनीने सांगितले.

सध्या सनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत निसर्गाच्या सानिध्यात आपला वेळ घालवत आहे. अनेकदा ती आपले फोटेदेखील सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच तिने पालेभाज्या तोडतानाचा आणि जिराफाला चारा खाऊ घालतानाचा आपला फोटो शेअर केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.