नवी दिल्ली - बॉलिवूड जगतात आपल्या हॉट आणि बोल्ड अवतारसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सनी लिओन बर्याचदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. यावेळी पण सनी एका अतिशय विचित्र कारणामुळे चर्चेत आहे. कोलकाता येथील महाविद्यालयात बीए प्रवेशासाठी जाहीर केलेल्या पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये सनी लिओनचे नाव सर्वात टॉपमध्ये आढळले. गुणवत्ता यादीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
-
See you all in college next semester!!! Hope your in my class ;) 😆😜
— sunnyleone (@SunnyLeone) August 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">See you all in college next semester!!! Hope your in my class ;) 😆😜
— sunnyleone (@SunnyLeone) August 28, 2020See you all in college next semester!!! Hope your in my class ;) 😆😜
— sunnyleone (@SunnyLeone) August 28, 2020
बीए इंग्लिश ऑनर्स कोर्सच्या प्रवेशासाठी कोलकाताच्या आशुतोष महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीमध्ये नाव आल्यानंतर सनीने आपली मिश्किल प्रतिक्रिया दिली आणि तिने आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली. सनीने ट्विट करून लिहिले की, मी तुम्हाला पुढच्या सत्रात कॉलेजमध्ये भेटते. मला आशा आहे की तुम्ही माझ्या वर्गात असाल.
या व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये केवळ सनी लिओनचे नाव गुणवत्ता यादीत अव्वल स्थानावर नाही तर पश्चिम बंगाल उच्च माध्यमिक शिक्षण परिषदेच्या सर्वसाधारण गटात बारावीच्या बोर्ड परीक्षेत या अभिनेत्रीचे 400 गुण असल्याचे सांगितले जाते. गुणवत्ता यादीमध्ये अभिनेत्रीचा रोल नंबर 207777-6666 आणि आयडी 9513008704 असल्याचा उल्लेख आहे.
दरम्यान, महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी भवानीपूर पोलीस स्टेशन आणि सायबर पोलीस स्टेशन कोलकाता येथे तक्रारी केल्या आहेत. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तेथे खळबळ उडाली आहे. महाविद्यालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे एका खोडसाळपणा करणार्या व्यक्तीचे काम आहे, कारण एखाद्याने लिओनच्या नावाने मुद्दाम चुकीचा अर्ज जमा केला आहे.