ETV Bharat / sitara

चित्रपटाच्या पोस्टरवर फोटो छापल्यामुळे सुनिल शेट्टीची पोलिसात तक्रार - unauthorized poster of Sunil shetty

विनिता या चित्रपटांमध्ये सुनील शेट्टी याच्या संमतीशिवाय त्याचा फोटो वापरण्यात आलेला असून याद्वारे नागरिकांकडून पैसासुद्धा वसूल केला जात असल्याची तक्रार सुनील शेट्टी यांनी वर्सोवा पोलिस ठाण्यामध्ये केली आहे.

sunil-shettys
सुनील शेट्टी
author img

By

Published : Mar 4, 2021, 1:03 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याने वर्सोवा पोलिस ठाण्यांमध्ये बालाजी मीडिया फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. विनिता या चित्रपटांमध्ये सुनील शेट्टी याच्या संमतीशिवाय त्याचा फोटो वापरण्यात आलेला असून याद्वारे नागरिकांकडून पैसासुद्धा वसूल केला जात असल्याची तक्रार सुनील शेट्टी यांनी वर्सोवा पोलिस ठाण्यामध्ये केली आहे.

sunil-shettys
विनिता या चित्रपटांमध्ये सुनील शेट्टी

काय म्हटले आहे सुनील शेट्टीने तक्रारीत?

या संदर्भात सुनील शेट्टी यांनी म्हटले आहे की मला या चित्रपटाबद्दल कुठलीही माहिती नसून हा चित्रपट कोणी बनवला आणि ही माणसं कोण आहेत त्याच्या बद्दलची माहिती माझ्याकडे नाही. मात्र , असं असताना सुद्धा माझ्या संमतीशिवाय या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये माझा फोटो वापरण्यात आलेला आहे व त्याद्वारे नागरिकांकडून पैसेसुद्धा घेतले गेल्याचं मला कळल्यानंतर यासंदर्भात मी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.

बालाजी मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचा खुलासा

यासंदर्भात बालाजी मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अमरप्रीत कौर व अर्जित चॅटर्जी यांनी खुलासा करत म्हटले आहे की आम्ही दोन चित्रपटांची निर्मिती करणार होतो. यासाठी आम्ही अभिनेता सुनील शेट्टी, बॉबी देओल सारख्या नावांचा विचार केलेला होता. या पोस्टरमध्ये त्यांचा फोटो फक्त यासाठी वापरण्यात आलेला होता की, सदरच्या पात्रात हे दोघे बसतात की नाही हे आम्हाला तपासायचे होते. मात्र, हे पोस्टर सोशल माध्यमांवर कशाप्रकारे वायरल झाले याबद्दलची माहिती आमच्याकडे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - दाक्षिणात्य अभिनेत्रीला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.