ETV Bharat / sitara

सुनिल शेट्टीचा मुलगा अहान 'तडप'मधून करणार बॉलिवूड पदार्पण - नाडियाडवाला ग्रॅन्डसन एन्टरटेन्मेंट

अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी लवकरच तारा सुतारियाबरोबर आगामी तडप चित्रपटामधून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. रिलीजच्या तारखेची घोषणा करत निर्मात्यांनी चित्रपटाची पोस्टर्स प्रसिद्ध केले असून यात तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहे.

Tadap movie poster
तडप सिनेमाचे पोस्टर
author img

By

Published : Mar 2, 2021, 5:29 PM IST

मुंबई - अभिनेता मिलान लूथरियाचा आगामी 'तडप' हा चित्रपट २४ सप्टेंबरला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटातून अभिनेता सुनिल शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल. यात त्याची जोडी अभिनेत्री तारा सुतारियासोबत आहे. रिलीजची तारीख आणि इतर तपशिलांबरोबरच चित्रपटाचे एक पोस्टरही प्रसिध्द करण्यात आले आहे.

Tadap movie poster
तडप सिनेमाचे पोस्टर

नाडियाडवाला ग्रँडसन एन्टरटेन्मेंट या बॅनरखाली बनणारा 'तडप' हा चित्रपट तेलुगू हिट फिल्म 'आरएक्स १००' चा रिमेक आहे. मूळ चित्रपटात कार्तिकेय गुम्माकोंडा आणि पायल राजपूत यांच्या प्रमुख भूमिकेत होते.

नाडियाडवाला ग्रॅन्डसन एन्टरटेन्मेंटने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि पहिले पोस्टर आपल्या अधिकृत ट्विटर पजवर शेअर केले आहे.

फॉक्स स्टार स्टुडिओद्वारे सादर होत असलेल्या 'तडप' या चित्रपटातून लेखक रजत अरोरा आणि मिलन लुथरिया पुन्हा एकदा दीर्घकाळानंतर एकत्र काम करीत आहेत. या दोघांनी 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई', 'द डर्टी पिक्चर' आणि 'बादशाहो' या चित्रपटासाठी एकत्र काम केले आहे. चित्रपटाचे संगीत प्रीतम यांचे असेल.

Tadap movie poster
तडप सिनेमाचे पोस्टर

हेही वाचा - हॅप्पी बर्थ डे टायगर श्रॉफ : बागी ते रॅम्बो पर्यंतचा अॅक्शन प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.