आपल्या चित्रपटांमध्ये ‘कोर्ट रूम ड्रामा’ प्रेक्षकांना खूपच आवडतो. पूर्वी काही कलाकार वकिलाच्या भूमिका वठविण्यासाठी प्रसिद्ध होते. प्रत्येक कलाकार आपल्या विविध भूमिकांच्या तयारीसाठी कठोर परिश्रम घेत असतात. सातत्याने आपल्यात फेरबदल करत राहणे आणि वेगवेगळ्या व्यक्तिरेखांची तयारी करत राहणे सोपे काम नाही आहे. अभिनेता अभिषेक बॅनर्जीने जो झी 5 च्या आगामी ‘रश्मि रॉकेट’ मध्ये एका वकीलाची भूमिका साकारली आहे आणि त्याने आपल्या कोर्टरूम मधील भूमिकेच्या तयारीसाठी अनोखी वाट चोखाळली.
'रश्मि रॉकेट' ही एका छोट्या गावातल्या तरुण मुलीची कथा आहे मात्र, तिच्याकडे धावण्याची अशी अविश्वसनीय अशी शक्ती आहे. तिला आपले स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची आणि स्पर्धेत व्यावसायिक रूपाने सहभागी होण्याची संधी मिळते मात्र, तिला हेही जाणवते की फिनिश लाइन आणि शर्यत यामध्ये अनेक संकटे आहेत. अखेरीस ही एथलेटिक स्पर्धा सन्मान आणि तिच्या व्यक्तिगत लढाईत रूपांतरित होते. खेळांमध्ये होणारे लिंग परीक्षण हा विषय चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
अभिषेक बॅनर्जी म्हणाला की, ‘माझ्या मित्राने मला असे सांगितले की वकिलांची स्वतःची अशी एक शैली असते आणि ते न्यायाधीशांना आपला मुद्दा पटवण्यासाठी त्यांच्या देहबोलीत तसेच आवाज आणि भाषणात बदल करतात आणि मी देखील इथे तेच करण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा मी कोर्टरूममध्ये होतो तेव्हा मी माझे व्यक्तिमत्व त्याप्रमाणे घडवण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा मी कोर्टरूमच्या बाहेर होतो तेव्हा मी पूर्णपणे वेगळा होतो.’
अभिषेक आपल्या भूमिकेबद्दल विस्ताराने बोलताना म्हणाला की, “मला न्यायालयीन कामकाज प्रत्यक्ष पाहण्यासाठी जायचे होते पण दुर्दैवाने लॉकडाऊनमुळे मी हे करू शकलो नाही कारण तेव्हा न्यायालये सुरु नव्हती किंवा ५०% क्षमतेनेच काम करत होती आणि जनतेला परवानगी नव्हती. मात्र, त्यानंतर मी माझ्या वकील मित्रांची मदत घेतली. माझा एक चांगला वकील मित्र वरिष्ठ वकील आहे आणि स्वतःची कंपनी चालवतो. मी त्याच्याशी बोललो आणि त्याने मला एका वकिलाच्या जीवनाबद्दल सांगितले आणि मी त्याचे निरीक्षण करत राहिलो की तो कसे एका साध्या विषयावरून त्या विषयाच्या कायदेशीरपणावर किती सहजतेने जातो आणि त्याने मला हे देखील सांगितले की कोर्टरूममधील काही वकील स्टार्स असतात आणि लोक खास करून त्यांची कार्यवाही ऐकायला कोर्टात येतात!"
तो पुढे म्हणाला की, ‘तसेच, या सर्व प्रक्रियेदरम्यान मला जाणवले की वकील हे कलाकार असतात, ते शॅडो प्रॅक्टिस करतात, ते त्यांच्या ओळींचा पूर्वाभ्यास करतात, ते त्यांचे संशोधन कार्य एखाद्या कसलेल्या अभिनेत्यांप्रमाणेच करतात. म्हणून, मला ईशित म्हणून रिहर्सल करण्यासाठी एक चांगला बॅलन्स शोधायचा होता पण अभिनेता म्हणून नव्हे. मी या प्रक्रियेचा पूर्णपणे आनंद घेतला.’
रॉनी स्क्रूवाला, नेहा आनंद आणि प्रांजल खंडड़िया यांच्याद्वारे निर्मित, 'रश्मी रॉकेट' नंदा पेरियासामी, अनिरुद्ध गुहा आणि कनिका ढिल्लों द्वारा लिखीत असून तापसी पन्नू प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटात सुप्रिया पाठक, अभिषेक बनर्जी, प्रियांशु पेन्युली आणि सुप्रिया पिळगांवकर देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
'रश्मि रॉकेट' येत्या १५ ऑक्टोबरला झी5 वर प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा - आर्यनसारख्या मुलांऐवजी खुनी, बलात्काऱ्यांना पकडण्यावर भर द्यावा - सोमी अली