ETV Bharat / sitara

अमिताभ बच्चनच्या 'जलसा' बाहेर तीव्र आंदोलन, २२ विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात - protest infront of Big B bungalow for Save Aarye

अमिताभ बच्चन यांनी आरे परिसरात होणाऱ्या वृक्ष तोडीला विरोध न करता घरी झाडे लावण्याचा सल्ला ट्विटरवरुन दिला होता. याच मुद्द्यावरुन विद्यार्थी आक्रमक झाल्याचे आज पाहायला मिळाले. य़ावेळी त्यांनी जलसा बंगल्याच्या बाहेर आंदोलन केले.

जलसा बंगल्याबाहेर तीव्र आंदोल
author img

By

Published : Sep 20, 2019, 1:06 AM IST

मुंबई - आरे बचाव आंदोलकांनी काल अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर निदर्शने केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या बिग बी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आज मात्र त्यांच्या बंगल्याच्या बाहेर विद्यर्थ्यांनी आंदोलन करून संपूर्ण जलसा परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी आंदोलकांना हुसकवण्याचा प्रयत्न केला; पण विद्यार्थी माघार घेत नव्हते. अखेर २२ विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या मित्राला वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ जावे लागले होते. तेव्हा त्यांनी कारने प्रवास करण्याचा निर्णय न घेता मेट्रोने प्रवास केला. मेट्रोच्या जलद प्रवासामुळे बिग बींचा मित्र प्रभावित झाला. मेट्रोचा प्रवास जलद, सोयीस्कर असल्याचं मत त्यांनी नोंदवलं. 'प्रदूषणावर उपाय म्हणून अधिक झाडे लावा'...मी माझ्या बागेत लावली; तुम्ही लावली का? अशा आशयाचे ट्विट बिग बी यांनी काल केले होते.

अमिताभ यांच्या ट्विटचे मेट्रो प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालिका अश्विनी भिडे यांनी रिट्विट करत स्वागत केले होते. यामुळे सेव्ह आरेच्या सदस्यांनी बिग बींबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

आरे बचावसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अमिताभ यांनी मूक संमती दिल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. अमिताभ यांनी आता मौन सो़डून स्वतची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. नाहीतर यापुढे आणखी तीव्र आंदोलन होऊ शकते, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

Intro:Body:

ent mar.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.