ETV Bharat / sitara

राजमौली बॉक्स ऑफिसचा खरा 'बाहुबली', RRR रचणार इतिहास - SS Rajamouli Upcoming Movies

एसएस राजामौली हा आजच्या घडीचा बारतातील एकमेव असा दिग्द्रशक आहे ज्याचा एकही चित्रपट फ्लॉप झालेला नाही. बॉक्स ऑफिसवर पुन्हा राज्य करण्यासाठी तो आरआरआर घेऊन पुन्हा सज्ज झाला आहे.

RRR रचणार इतिहास
RRR रचणार इतिहास
author img

By

Published : Mar 25, 2022, 12:43 PM IST

RRR हा मल्टीस्टारर चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट जर तुम्ही पाहणार असाल तर त्याआधी तुम्हाला हे माहित असलेच पाहिजे की राजामौली हा बॉक्स ऑफिसवरचा बाहुबली का आहे? एसएस राजामौलीच्या 5 ब्लॉकबस्टर चित्रपटांबद्दल जाणून घ्या ज्यांनी त्यांना 'द राजामौली' बनवले.

एसएस राजामौली रचणार इतिहास - एसएस राजामौली हा देशातील अव्वल दिग्दर्शकांपैकी एक असा चित्रपट निर्माता ज्याचा चित्रपट आजपर्यंत फ्लॉप झालेला नाही. ज्या दिवसापासून त्याने दिग्दर्शनाच्या दुनियेत पाऊल ठेवले त्या दिवसापासून त्याने मागे वळून पाहिलेले नाही. त्याच्या चित्रपटांनी रेकॉर्डब्रेक कमाई करून इतर प्रादेशिक चित्रपटांना आरसा दाखवला आहे. राजामौली यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट RRR रिलीज झाला आहे. हा चित्रपटही सुपर डुपर हिट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जर तुम्ही RRR पाहणार असाल तर त्याआधी तुम्हाला हे माहित असलेच पाहिजे की राजामौली हा बॉक्स ऑफिसचा बाहुबली का आहे? या बातमीत आपण राजामौलीच्या अशा 5 चित्रपटांबद्दल जाणून घेऊ ज्यांनी दिग्दर्शकाच्या करिअरला शिखरावर नेले. या चित्रपटांनी केवळ दक्षिण पट्ट्यातच नव्हे तर हिंदी पट्ट्यातही कमाईचा झेंडा रोवला.

बाहुबली
बाहुबली

1. बाहुबली - एसएस राजामौलींच्या त्या एका चित्रपटाने देश-विदेशात धुमाकूळ घातला आणि विक्रमी कमाई करून भारतीय चित्रपटसृष्टीला अभिमान वाटू लागला. त्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'बाहुबली'बद्दल प्रथम बोलूया. 'बाहुबली : द बिगिनिंग' आणि 'बाहुबली - द कन्क्लूजन'ने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करून इतिहास रचला. प्रभास, राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी यांच्या या चित्रपटाने जगभरात १८०० कोटींचा व्यवसाय केला. 'बाहुबली' फ्रँचायझीने एकूण 5 राष्ट्रीय पुरस्कार जिंकले.

Eega (मक्खी)
Eega (मक्खी)

2. Eega (मक्खी) - एखादी माशी गुंडांचा सर्वनाश करेल याची कोणी कल्पना करू शकेल का? नाही, नाही पण असे राजामौली यांना वाटत होते. 2012 मध्‍ये मक्‍खी या फॅण्‍टसी चित्रपटाने प्रचंड कमाई केली होती. नानी, सुदीप आणि सामंथा यांचा हा चित्रपट त्याच्या वेगळ्या कथानकासाठी लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटाने जवळपास 130 कोटींची कमाई केली होती. त्‍याच्‍या नावावर 2 नॅशनल अॅवॉर्डही मिळाले. नायक माशीच्या रूपात कसा पुनर्जन्म घेतो आणि आपल्या प्रियकराला शत्रूंपासून वाचवतो हे चित्रपटात दाखवले आहे.

मगधीरा
मगधीरा

3. मगधीरा - मगधीरा हा पीरियड अॅक्शन ड्रामा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल. रामचरण आणि काजल अग्रवाल यांचा हा चित्रपट पुनर्जन्माच्या कथेवर आधारित होता. या चित्रपटाला 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 150 कोटींची कमाई केली. यापूर्वी हा चित्रपट हिंदी रिमेक होणार होता व ज्यामध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिकेत असणार होता. पण हे शक्य झालेले नाही.

विक्रमकुडू
विक्रमकुडू

4. विक्रमकुडू - तुम्हाला माहित आहे का अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांचा राउडी राठौर हा चित्रपट दिग्दर्शक राजामौली यांच्या विक्रमकुडू चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. 2006 मध्ये रिलीज झालेल्या या तेलुगु हिट चित्रपटात रवी तेजा आणि अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत होते. या अॅक्शन थ्रिलरने जवळपास 118 कोटींची कमाई केली होती.

यमडोंगा
यमडोंगा

5. यमडोंगा - 2007 मध्ये आलेला यमडोंगा हा तेलुगु अॅक्शन कॉमेडी चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, मोहन बाबू, प्रियामणी, ममता मोहनदास यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट समीक्षकांना चांगलाच आवडला होता.

आम्ही तुम्हाला राजामौलीच्या फक्त 5 सर्वकालीन ब्लॉकबस्टर चित्रपटांबद्दल सांगितले आहे, परंतु ही यादी तिथेच संपत नाही. राजामौली यांनी आतापर्यंतच्या कारकिर्दीत केलेले सर्व चित्रपट आवर्जून पहावेत असेच आहेत. आता राजामौली आरआरआर मधून पुन्हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट घेऊन बॉक्स ऑफिसवर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे.

हेही वाचा - सई ताम्हणकर : रतीरूप अजिंठा शिल्प, कोरिले कुणी, उभी सत्कारा...हे सुंदरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.