ETV Bharat / sitara

Special Interview With Yogesh Bhosale : प्रत्येक दिग्दर्शक उत्तम अभिनेता असणे गरजेचे आहे - शीतल अहिरराव

दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्ही बाजू सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागली का या प्रश्नाला उत्तर देताना योगेश ( Special Interview With Yogesh Bhosale ) म्हणाले की, “एक प्रेक्षक म्हणून मला असे वाटते की एक दिग्दर्शक उत्तम अभिनेता असायला हवा तसेच नटालाही दिग्दर्शकीय दृष्टी असावी.

143
143
author img

By

Published : Feb 28, 2022, 7:11 PM IST

Updated : Mar 1, 2022, 6:08 PM IST

मुंबई - 143 म्हणजे आय लव्ह यु हे सर्वश्रुत आहे. आणि हीच व्याख्या घेऊन दिग्दर्शक योगेश भोसले एक नवीन चित्रपट घेऊन आलेत, ‘143’ नावाचा, जो येत्या ४ मार्च ला महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी त्यांच्याशी आणि चित्रपटाची नायिका शीतल अहिरराव बरोबर संवाद साधला. “प्रेम हे वैश्विक सत्य आहे. त्याला वयाचंही बंधन नसतं. हल्ली शाळा-कॉलेजातील मुलांनाही 143 चा अर्थ ‘I Love you’ आहे हे माहित असतं आणि त्यामुळेच आमच्या चित्रपटाची टॅग लाईन आहे ‘हे आपलं काळीज हाय’! प्रत्येकाच्या हृदयात प्रेम ही भावना धडधडत असते. या प्रेमासाठी जगण्याची आणि एकमेकांना दाखवण्याची व्याख्या ‘143’ मधून मांडण्यात आली आहे”, असे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता योगेश भोसले म्हणाले.

प्रेक्षकांनी पहावा असा चित्रपट
शीतल अहिरराव म्हणाली की, “या चित्रपटात मधू आणि विशू च्या निस्वार्थी आणि सखोल प्रेमाची गोष्ट साकारण्यात आली आहे. योगेश सर स्वतः माझ्यासोबत लीड ला आहेत. आणि त्यांच्या दिग्दर्शक होण्याचा मला फायदाच झाला. सीन्स रिहर्स करतानाच हे मला काही सुचवायचे किंवा टेक च्या दरम्यान माझी काही चूक होत असेल तर ताबडतोब दुरुस्त करून घ्यायचे. या चित्रपटातील गोष्ट नाशिक शहरात घडते. आणि मी स्वतः नाशिककर असल्यामुळे हा चित्रपट माझ्या हृदयाच्या जास्त जवळ आहे.”

हेही वाचा - Love Story of Ukraine President : व्होलोडिमिर झेलेन्स्कींचे 8 वर्षांच्या डेटिंगनंतर झेलेन्स्काशी झाले लग्न

अभिनेत्याला दिग्दर्शकाची दृष्टी हवी

दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्ही बाजू सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागली का या प्रश्नाला उत्तर देताना योगेश म्हणाले की, “एक प्रेक्षक म्हणून मला असे वाटते की एक दिग्दर्शक उत्तम अभिनेता असायला हवा तसेच नटालाही दिग्दर्शकीय दृष्टी असावी. मला दिग्दर्शक आणि अभिनेता या दोन्ही गोष्टी एकाचवेळी करताना अजिबात त्रास नाही झाला. परंतु इतर कलाकारांकडून हवे ते काढून घेण्यात थोडा फार त्रास झाला असे म्हणायला वाव आहे. अर्थात चांगला अभिनय करवून घेणे हे दिग्दर्शकाचे काम असते. मला मी इमॅजिन केलेली गोष्ट जोपर्यंत पडद्यावर दिसत नाही तोपर्यंत मी समोरच्यांकडून काम करवून घेत असतो. गेली ७-८ वर्षे ही गोष्ट माझ्या मनात रुंजी घालत होती. मला या चित्रपटाच्या कथेचा आत्मा माहित होता त्यामुळे अभिनय करणे सोप्पं गेलं.”

योगेश शीतल सोबत गप्पा

सोशल मिडीया वर सक्रीय
शीतल सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. त्याबद्दल सांगताना ती म्हणाली, “खरंतर सोशल मीडिया हा कलाकार आणि प्रेक्षकांमधील दुवा आहे. कोणाकडे एखाद टॅलेंट असेल ते या माध्यमातून खूप लोकांपर्यंत लवकर पोहोचवता येतं. माझ्यामते लोकांमध्ये पोहोचण्याचा हा सोप्पा मार्ग आहे. मला संगीताची आवड आहे आणि मी म्युझिक व्हिडीओजही खूप केलेत. आणि या माध्यमांमार्फत त्यांना फायदाही झालाय.” नाटकं, चित्रपट, म्युझिक व्हिडीओज मधून शीतल झळकत असते आणि त्यातील जास्त काय आवडते हे विचारल्यावर ती उत्तरली, “ॲक्टिंग. मला रियल लाईफ मधेही ॲक्टिंग करायला आवडते.”

हेही वाचा - आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी'ची घोडदौड सुरूच, वाचा तिसऱ्या दिवशीची कमाई

Last Updated : Mar 1, 2022, 6:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.