चेन्नई : प्रसिद्ध पार्श्वगायक एस.पी. बालासुब्रमण्यम यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अद्यापही त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे.
रुग्णालयाने प्रसिद्ध केलेल्या मेडिकल बुलेटिननुसार, सुब्रमण्यम हे सध्या आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर आणि ईसीएमओ सपोर्टवर आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक सतत त्यांचे निरीक्षण करत आहे. त्यांच्या महत्त्वपूर्ण अवयवांचा प्रतिसाद सध्या तरी समाधानकारक आहे, असेही या बुलेटिनमध्ये म्हटले होते.
५ ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपल्याला कोरोनाची हलकी लक्षणे दिसून आली असल्याचे त्यांनी स्वतःच फेसबुकवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये सांगितले होते. ताप येणे-जाणे, सर्दी आणि श्वसनाचा त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर रुग्णालयात तपासणी केली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
हेही वाचा : 65 वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी - सांस्कृतिक मंत्री