मुंबई - बॉलिवूड स्टार सोनू सूद याने ७ एप्रिलला पंजाबच्या अमृतसर येथील रुग्णालयात कोविडची लस घेतली होती. दरम्यान त्याला कोरोना बाधा झाल्याची बातमी त्यानेच दिली आहे.
कोरोना बाधा झाल्याचे निवेदन त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. गेल्या वर्षी देशभरात लॉकडाऊन चालू असताना स्थलांतरितांना त्यांच्या मायदेशी पोहचण्यासाठी मोठी मदत सोनूने केली होती. गरजूंसाठी तो नेहमीच मदतीला पुढे येत असतो. त्याला कोरोनाची बाधा झाल्यामुळे देशभरातील तमाम चाहत्यांनी बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकजण सोनूसाठी प्रार्थना करीत आहेत.
- — sonu sood (@SonuSood) April 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— sonu sood (@SonuSood) April 17, 2021
">— sonu sood (@SonuSood) April 17, 2021
सोनूने लिहिले आहे, ''आज सकाळी माझी कोविड-१९ टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याचे तुम्हास कळवत आहे. सावधगिरीचा भाग म्हणून, मी क्वारंटाईन झालो आहे आणि अत्यंत काळजी घेतली आहे."
त्याने पुढे लिहिलंय, "परंतु काळजी करू नका, यामुळे मला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. लक्षात ठेवा मी तुम्हा सर्वांसाठी नेहमीच कार्यरत असेन."
सोनू सूदने बुधवारी पंजाबमध्ये ७ एप्रिलला अमृतसर येथे कोविडची लस घेतली. त्याने लसीकरणाबाबत लोकांचे प्रबोधन करण्यासाठी ''संजीवनी: ए शॉट ऑफ लाइफ'' ही मोहीमही सुरू केली आहे.
हेही वाचा - कॅन्सल बोर्ड परीक्षा' याचिकेच्या मोहीमेत सोनू सूददेखील सामील