ETV Bharat / sitara

सोनू सूदने कंका दुर्गा मंदिरात 'या' कारणासाठी केली प्रार्थना

बॉलिवूडचा सशक्त अभिनेता आणि गरिबांचा मसीहा म्हणून ओळखला जाणारा सोनू सूद गुरुवारी विजयवाडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. विमानतळावर त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर सोनू विजयवाडा येथील कंका दुर्गा मंदिरा दर्शनासाठी पोहोचला. यावेळी त्याने कोरोना महामारीपासून लोकांना वाचवण्यासाठी विशेष पूजा आणि प्रार्थना केली. कडे रवाना झाला.

सोनू सूद
सोनू सूद
author img

By

Published : Sep 9, 2021, 10:49 PM IST

हैदराबाद - बॉलिवूडचा सशक्त अभिनेता आणि गरिबांचा मसीहा म्हणून ओळखला जाणारा सोनू सूद गुरुवारी विजयवाडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. विमानतळावर त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर सोनू विजयवाडा येथील कंका दुर्गा मंदिराकडे रवाना झाला.

या दरम्यान, सोनू म्हणाला की त्याने कोरोना महामारीपासून लोकांना वाचवण्यासाठी विशेष पूजा आणि प्रार्थना केली आहे. यानंतर अभिनेता एका खासगी कार्यक्रमात सहभागी झाला.

सोनूने विजयवाडामध्ये अंकुर नावाचे हॉस्पिटल सुरू केले आहे. तो म्हणाले की, कोविड दरम्यान अंकुर हॉस्पिटलमधून मुलांना चांगली औषधे दिली गेली. या कारणास्तव, तो रुग्णालयाचा ब्रँड अॅम्बेसेडर बनला आहे.

आपल्या कामाबद्दल बोलताना सोनू म्हणाला की तो तेलगू, हिंदी आणि इंग्रजी या भाषेतील अनेक चित्रपटांसाठी काम करीत आहे. विजयवाडातील लोकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल सोनूने त्यांचे आभारही मानले.

समारंभात बोलताना सोनूने पुढे सांगितले की, तो त्याच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात विजयवाडा येथे आला होता आणि भविष्यात तो येथे आपले घर बनवू शकतो.

सोनू सूदच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर तो 'पृथ्वीराज' या हिंदी आणि 'थमीलारासन' या तमिळ चित्रपटात दिसणार आहे. याबरोबरच सुपरस्टार चिरंजीवीचा तेलुगु चित्रपट 'आचार्य'मध्येही तो झळकणार आहे.

हेही वाचा - सौरव गांगुलीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 'दादा'च्या बायोपिकची झाली घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.