मुंबई - कोरोनव्हायरसमुळे देशव्यापी लॉकडाऊनने ग्रस्त झालेल्या मृत आणि जखमी प्रवासी कामगारांच्या 400 कुटुंबांना आर्थिक मदत करणार असल्याचे अभिनेते सोनू सूद यांनी सोमवारी सांगितले. सोनू सूदने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडसह विविध राज्यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि आपला जीव गमावून बसलेल्या स्थलांतरितांशी संबंधित पत्ते आणि बँक तपशीलाची माहिती घेतली.
"मी मृत किंवा जखमी झालेल्या परप्रांतीयांचे सुरक्षित भविष्य घडविण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना आधार देण्याची आपली वैयक्तिक जबाबदारी आहे असे मला वाटते," असे सूदने एका निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा - अभिषेक बच्चनचा 'ब्रिथ' मालिकेतला सहकारी अमित साधची कोरोना चाचणी आली निगेटिव्ह
सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात घरी परतणाऱ्या प्रवासी मजूरांना पोहोचवण्यासाठी स्वखर्चाने मोठी मोहिम राबवली होती. यामुळे हजारो मजूरांना घरी सुरक्षित पोहोचण्यास त्याच्या मदतीचा लाभ झाला होता.
गेल्या महिन्यात, सोनूने 300 हून अधिक प्रवासी कामगारांना उड्डाण करण्यासाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली होती.