मुंबई - शाहिद कपूर स्टारर 'जर्सी'मधील 'बलीये रे' हे तिसरे गाणे रिलीज होताच धमाल करत आहे. सचेत-परंपरा या संगीतकार जोडीने रचलेल्या रोमँटिक गाण्यात शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर झळकले आहेत. गाण्याबद्दल बोलताना सचेत-परंपरा म्हणाले- 'बलीये रे' हे एक रोमँटिक गाणे आहे. गाण्यातील शाहिद आणि मृणालची केमिस्ट्री तुम्हाला तुमच्या सीटवर खिळवून ठेवेल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
चित्रपटाचे निर्माते अमन गिल म्हणाले की, 'बलीये रे' हे सचेत-परंपराचे अप्रतिम गाणे आहे. तुम्ही आत्तापर्यंत त्यांच्या संगीताला दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि मला आशा आहे की तुम्ही 'बलीये रे'चा देखील आनंद घ्याल.
गौतम तिन्ननुरी दिग्दर्शित या चित्रपटात शाहिद कपूर दोन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. चित्रपटाची कथा एका अयशस्वी क्रिकेटपटूभोवती फिरते. तो भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करण्याच्या आशेने 3 दशकांनंतर क्रिकेटमध्ये परतण्याचा निर्णय घेतो आणि त्याच्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला एक जर्सी भेट दिली जाते.
तेलुगु चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे जर्सी
'जर्सी' हा चित्रपट त्याच नावाच्या तेलुगु स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात शाहिद कपूर एका क्रिकेटरच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात शाहिद कपूरशिवाय मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस 31 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - पाहा, नवविवाहित राजकुमार आणि पत्रलेखाचा मजेशीर फोटो