ETV Bharat / sitara

सोनमने केले पतीचे कौतुक...म्हणते, ''तुझ्याशिवाय मी काय करू शकले असते?'' - सोनम कपूर

अभिनेत्री सोनम कपूरने पती आनंद आहुजासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. पॅरिसच्या सुट्टीवर गेले असतानाचा हा जुना फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Sonam Kapoor
सोनमने केले पतीचे कौतुक
author img

By

Published : May 14, 2020, 7:42 PM IST

मुंबई - अभिनेत्री सोनम कपूरने आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर व्यक्ती आणि महत्त्वाचा व्यक्तीबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना पती आनंद आहुजासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. पॅरिसच्या सुट्टीवर गेले असतानाचा हा जुना फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आपल्या नवऱ्याला हा फोटो समर्पित करताना सोनमने कॅप्शनमध्ये आनंदचे कौतुक केले आहे. तिने लिहिलंय, ''जगातील सर्वात सुंदर पतीचे कौतुक करणारी पोस्ट...जो माझ्या भावना चांगल्या प्रकारे सांभाळतो आणि विनाशर्त प्रेम करतो. तुझ्याशिवाय मी काय करू शकले असते, हे मला माहिती नाही @anandahuja लव यू.''

गेल्या आठवड्यात तिने एक फोटो शेअर करीत लॉकडाऊनमध्ये कसा सुरू आहे हे कळवले होते. तिने पतीसोबत पुस्तक वाचतानाचा फोटो शेअर केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.