ETV Bharat / sitara

सोनम कपूर पती आनंदच्या आठवणीने झाली व्याकूळ, विरहात शेअर केला फोटो - सोनम कपूरला नवऱ्याची आठवण

बॉलिवूड फॅशनिस्टा सोनम कपूरला तिचा नवरा आनंद आहुजा याची खूप आठवण येत आहे. सोनमने यासाठी इन्स्टाग्रामवर आनंदसाठी पोस्ट लिहिली आहे. यात तिने फार काळ भेटण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नसल्याचे म्हटलंय.

सोनम कपूर पती आनंदच्या आठवणीने झाली व्याकूळ,

author img

By

Published : Aug 30, 2021, 8:06 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर पती आनंद आहुजासोबत वर्षभराहून अधिक काळ यूकेमध्ये राहिल्यानंतर गेल्या महिन्यात भारतात परतली होती. 14 ऑगस्टला ती बहिण रिया कपूर आणि करण बूलानी यांच्या लग्नासाठी भारतात परतली होती. या विवाह सोहळ्यासाठी आनंदही सहभागी झाला परंतु नंतर तो दिल्लीला घरी रवाना झाला होता. याला आता पंधरवडा पूर्ण झाला आहे आणि सोनमला त्याचा विरह सहन होईना झालाय.

सोनमने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला ज्यामध्ये तिचा नवरा तिचा हात हातात घेताना दिसत आहे. फोटो शेअर करताना सोनमने लिहिले, "मला तुझी खूप आठवण येते ... तुला भेटण्यासाठी वाट पाहू शकत नाही." या फोटोत सोनम चमकदार गुलाबी ड्रेस परिधान करताना दिसत आहे तर आनंद नेव्ही ब्लू ब्लेझरमध्ये मॅचिंग पॅंट आणि पांढऱ्या टी-शर्टसह दिसत आहे.

दरम्यान, कामाच्या पातळीवर सोनम आगामी क्राईम थ्रिलर 'ब्लाइंड'मध्ये दिसणार आहे. सुजॉय घोष निर्मित आगामी थ्रिलरमध्ये अभिनेत्री सोनम अंध व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. इतर कलाकारांमध्ये विनय पाठक, पूरब कोहली आणि लिलेट दुबे देखील आहेत. 'ब्लाइंड' 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच नावाच्या दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारित आहे.

हेही वाचा - बॉलीवुड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची ईडीकडून सलग पाच तास चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.