ETV Bharat / sitara

सोनाक्षीनं शेअर केला 'भूज: द प्राईड ऑफ इंडिया'च्या सेटवरील फोटो - sanjay dutt

हैदराबादच्या रामोजी फिल्म सीटीमध्ये सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. सोनाक्षी या चित्रपटात सामाजिक कार्यकर्ती सुंदरबेन जेठा यांची भूमिका साकारत आहे.

सोनाक्षीनं शेअर केला 'भूज: द प्राईड ऑफ इंडिया'च्या सेटवरील फोटो
author img

By

Published : Jul 10, 2019, 11:49 PM IST

मुंबई - सोनक्षी सिन्हा लवकरच 'खानदानी शफाखाना' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशात आता तिनं आणखी एका चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. १९७१ च्या भारत पाक युध्दाची कथा असलेल्या 'भूज: द प्राईड ऑफ इंडिया' चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली होती. आता सोनाक्षीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर केला आहे.

हैदराबादच्या रामोजी फिल्म सीटीमध्ये सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. सोनाक्षी या चित्रपटात सामाजिक कार्यकर्ती सुंदरबेन जेठा यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या सेटवरील मातीच्या घराचा फोटो शेअर करत 'भूज: द प्राईड ऑफ इंडिया' असं कॅप्शन सोनाक्षीनं दिलं आहे.

bhuj the pride of india
सोनाक्षीनं शेअर केला 'भूज: द प्राईड ऑफ इंडिया'च्या सेटवरील फोटो

अजय देवगण या चित्रपटात स्क्वाड्रन लिडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अजय आणि सोनाक्षीशिवाय दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणिता सुभाष, संजय दत्त, राणा दग्गुबती आणि परिणीती चोप्रा यांच्याही महत्वाच्या भूमिका असणार आहेत. अभिषेक दुधाईया या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून १४ ऑगस्ट २०२० ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.