मुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूर मलायकासोबतच्या नात्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. अनेकदा या कपलला एकत्र स्पॉट केले गेले आहे. जेव्हा हे दोघेही एकत्र असताना मीडियाचा कॅमेरा समोर येतो तेव्हा दोघेही तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात, हे काही नवीन नाही. मात्र, आजकाल अर्जून मलायकासोबत नसतानाही आपला चेहरा मीडियापासून लपवताना दिसतो, असे का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
यामागचं कारण आहे, त्याचा आगामी चित्रपट. लवकरच तो पानिपत चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातील पेशवाच्या भूमिकेतील अर्जूनचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित होण्याआधीच प्रेक्षकांनी तो पाहू नये म्हणून दिग्दर्शनेच अर्जूनला हा सल्ला दिला असल्याचे अर्जूनने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
१४ जानेवारी १७६१ ला झालेल्या पानिपतच्या युद्धावर हा चित्रपट आधारित असणार आहे. चित्रपटात अर्जूनशिवाय संजय दत्त, क्रिती सेनॉन आणि माधुरी दीक्षित यांच्याही महत्तवाच्या भूमिका असणार आहेत. आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ६ डिसेंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. ऐतिहासिक कथानक असलेल्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकही उत्सुक आहेत.