मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून रियाला २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रियाची रवानगी आज (बुधवार) भायखळ्याच्या तुरुंगात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूड कलाकारांनी रियाच्या बचावासाठी पुढाकार घेतला आहे. करिना कपूर खान, विद्या बालन, सोनम कपूर, अनुराग कश्यप, राधिका आपटे, हुमा कुरेशी, श्वेता बच्चन फरहान अख्तर यांच्यासह अनेक कलाकारांनी रियाला न्याय देण्याची मागणी केली आहे. या सगळ्यांकडून एक मेसेज ट्विट करण्यात आला आहे.
कलाकारांनी त्यांच्या ट्विटमध्ये समाजातील पितृसत्ताक पद्धतीचे वर्चस्व झुगारुन देण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे रिया चक्रवर्ती हिने परिधान केलेल्या टी-शर्टवरही हा मेसेज लिहण्यात आला होता. याशिवाय काही कलाकरांनी 'जस्टीस फॉर रिया' असा हॅशटॅग वापरला आहे.
!['Smash Patriarchy': Vidya Balan to Anurag Kashyap, Bollywood Bigwigs Demand Justice for Rhea](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/8732981_rrrrrrr.jpg)
या बॉलिवूड कलाकारांनी दिला रियाला पाठिंबा -
करिना कपूर खान, विद्या बालन, शिबानी दांडेकर, अनुराग कश्यप, सोनम कपूर, श्वेता बच्चन, दिया मिर्झा, शाहिन भट्ट, फरहान अख्तर, झोया अख्तर, अभय देओल, मलाईका अरोरा, अथिया शेट्टी आणि हुमा कुरेशी.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
बॉलिवूड शिवाय मराठी कलाकारांनीही रियाला न्याय देण्याची मागणी केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील मृण्मयी गोडबोले, ईशा केसकर, समीर विद्वांस यांनीदेखील रियाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आता बॉलिवूड खऱ्या अर्थाने रियाच्या बचावासाठी सरसावल्याचे दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, रियाचे वकिल सतीश माने शिंदे यांनी, रियाने ड्रग्ज घेतले नसल्याचे सांगितलं. कुणाच्या तरी सांगण्यावरुन तिने ड्रग्ज मागवले असल्याचे सांगत, रियाला जामीन दिला पाहिजे, असे मत नोंदवले. जामीन मिळाल्यावर रिया चौकशीत पूर्ण सहकार्य करेल, असेही माने शिंदे यांनी कोर्टात सांगितले.
यावर एनसीबीने रिया ही सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील आरोपी आहे. जामिनावर तिची सुटका केल्यास या प्रकरणावर परिणाम होऊ शकतो, असे म्हणणं कोर्टात सादर केले. तसेच रियाने अनेक महत्त्वाच्या गोष्टी चौकशीत उघड केल्या आहेत. यामुळे त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे, असे एनसीबीकडून कोर्टात स्पष्ट करण्यात आले.
तेव्हा दोन्ही बाजूंच्या युक्तिवाद विचारात घेऊन कोर्टाने रियाचा अर्ज फेटाळला आणि तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आज सकाळी रियाची रवानगी मुंबईतील भायखळा तुरुंगात केली जाणार आहे.