मुंबई - नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपट ४ मार्च रोजी देशभर रिलीज झाला. पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर थोडासा थंड प्रतिसाद मिळत असताना जे प्रेक्षक सिनेमा पाहातात त्यांना मात्र तो खूप आवडल्याचे सांगतात. या चित्रपटाची कथा आणि अमिताभ बच्चन यांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे. चित्रपटाची कमाई संथ गतीने सुरू झाली. पण वीकेंडला चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी झेप पाहायला मिळाली होती. रिलीजच्या सहाव्या दिवसानंतरही अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट चांगला कलेक्शन करत आहे. दरम्यान इंटरनेट मुव्ही डेटा बेस ( IMDb ) रेटींगही चित्रपटाचे उत्तम आहे. झुंड चित्रपटाला १० पैकी ९.३ आयएमडीबी रेटिंग मिळाले आहे.
-
this is so rare .. 👏👏👏 https://t.co/OjHwfZONKj
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">this is so rare .. 👏👏👏 https://t.co/OjHwfZONKj
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 9, 2022this is so rare .. 👏👏👏 https://t.co/OjHwfZONKj
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 9, 2022
'झुंड' हा चित्रपट दररोज 1 कोटींहून अधिक कमाई करत आहे. मंगळवारी या चित्रपटाने 1.30 कोटींची कमाई केली होती. सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी या चित्रपटाने जवळपास तितकीच कमाई केली आहे. असा दावा केला जात आहे की 'झुंड' चित्रपटाने बुधवारी म्हणजेच सहाव्या दिवशी सुमारे 1 कोटी कमावले आहेत, त्यानंतर चित्रपटाची एकूण कमाई आता 10 कोटींच्या आसपास पोहोचली आहे.
'झुंड' चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 1.50 कोटींची कमाई केली. यानंतर दुसऱ्या दिवशी कलेक्शनमध्ये चांगलीच वाढ झाली. चित्रपटाने आणखी 2.10 कोटी कमावले. तिसऱ्या दिवशी 2.90 कोटी आणि चौथ्या दिवशी 1.20 कोटी कमावले. यानंतर मंगळवारी म्हणजेच पाचव्या दिवशी 1.30 कोटींचे कलेक्शन झाले.
नागराज मंजुळे यांचा 'झुंड' चित्रपट हा फुटबॉलपटू विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. अमिताभ बच्चन यांनी बारसेंची व्यक्तीरेखा साकारली आहे. भूषण कुमार, क्रिश्न कुमार, तांडव फिल्म एंटरटेन्मेंट आणि आटपाट यांच्याअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ४ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट देशभर प्रदर्शित झाला आहे.
हेही वाचा - नवज्योत सिंह सिद्धू ट्रोल, कपिल शर्मा शोमध्ये जाण्याचा युजर्सचा सल्ला