ETV Bharat / sitara

सिद्धार्थला करायचय दीपिकासोबत काम, ट्विट करत व्यक्त केली इच्छा - jabariya jodi

एका यूजरने ट्विटरवर सिद्धार्थला एक प्रश्न केला. अशी कोणती अभिनेत्री आहे जिच्यासोबत तू आतापर्यंत काम केले नाही, मात्र तिच्यासोबत काम करण्याची तुझी इच्छा आहे.

सिद्धार्थला करायचय दीपिकासोबत काम
author img

By

Published : May 26, 2019, 8:54 AM IST

मुंबई - बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत सध्याच्या घडीला दीपिका पदुकोणचा क्रमांक पहिला आहे. बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिलेल्या या अभिनेत्रीने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घातली. आता सिद्धार्थ मल्होत्राही तिच्या या अदांवर फिदा झाला आहे.

एका यूजरने ट्विटरवर सिद्धार्थला एक प्रश्न केला. अशी कोणती अभिनेत्री आहे जिच्यासोबत तू आतापर्यंत काम केले नाही, मात्र तिच्यासोबत काम करण्याची तुझी इच्छा आहे. चाहतीच्या या प्रश्नावर लगेचच उत्तर देत सिद्धार्थने दीपिकाचे नाव घेतले.

सिद्धार्थसोबतच दोघांचे चाहतेही या जोडीला ऑनस्क्रीन एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान सिद्धार्थ लवकरच 'मरजावां', 'जबरिया जोडी' आणि 'शेरशाह'सारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर दीपिका मेघना गुलजार यांच्या 'छपाक' चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.