ETV Bharat / sitara

अनन्या पांडेला सिध्दांतने दिलेला जवाब बनला नेटकऱ्यांच्या 'मिम्स'चा विषय

घराणेशाहीच्या मुद्द्यावर अभिनेत्री अनन्या पांडेने दिलेले उत्तर आणि त्याला अभिनेता सिध्दांत चतुर्वेदीने,''जहाँ हमारे सपनें पूरे होते है, वहा इनके स्ट्रगल शुरू होते है.'' असे उत्तर दिले होते. यावर आता मिम्स बनत आहेत.

author img

By

Published : Jan 6, 2020, 10:09 PM IST

Sidhant and Aananya Pande
सिध्दांत आणि अनन्या पांडे

मुंबई - घराणेशाहीच्या मुद्द्यावर अभिनेत्री अनन्या पांडेने दिलेले उत्तर आणि त्याला अभिनेता सिध्दांत चतुर्वेदीने दिलेले हजरजबाबी उत्तर आता नेटकऱ्यांचा चर्चेचा विषय बनलाय. यातून अनेक मीम्सनी जन्म घेतलाय आणि सोशल मीडियावर हा रंजनाचा विषय ठरलाय.

हा किस्सा घडला होता समिक्षक राजीव मसंद यांच्या 'न्यूकमर्स राऊंडटेबल शो'मध्ये. इतर नवीन कलाकारांसोबत अनन्या पांडे आणि सिध्दांत चतुर्वेदी हजर होते. यावेळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवीन कलाकारांना किती संघर्ष करावा लागतो यावर चर्चा सुरू होती.

स्टार किड्सना तुलनेने संघर्ष करावा लागत नाही असा समज आहे. यावर बोलताना अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या म्हणाली की, ''मला नेहमीच कलाकार व्हायची इच्छा होती. मात्र माझे वडील अभिनेता असल्यामुळे मला संधी मिळत नव्हती. माझे वडिल कधीच धर्मा प्रॉडक्शनच्या सिनेमात काम केले नाहीत. किंवा कॉफी विथ करणमध्येही आले नाहीत. त्यामुळे लोक म्हणतात तितके सोपे नाही. प्रत्येकाचा एक स्वतंत्र प्रवास असतो, स्वतंत्र संघर्ष असतो.''

याला पटकन उत्तर देताना सिध्दांत चतुर्वेदी म्हणाला, ''जहाँ हमारे सपनें पूरे होते है, वहा इनके स्ट्रगल शुरू होते है.''

Funny Mims
सिध्दांतच्या उत्तरावर मजेशीर मिम्स

नेमक्या याच सिध्दांतच्या उत्तराचा आघार नेटकऱ्यांनी घेत मिम्स बनवायला सुरूवात केलीय.

Funny Mims
सिध्दांतच्या उत्तरावर मजेशीर मिम्स

''मित्र : मी एअरपॉड्स प्रे डिस्काऊंट किंमतीमध्ये २२००० ला घेतला.
मी : जहाँ हमारे सपनें पूरे होते है, वहा इनके स्ट्रगल शुरू होते है.''

Funny Mims
सिध्दांतच्या उत्तरावर मजेशीर मिम्स
अशा आशयाचा एक मीम्स एका युजरने बनवलाय. याच आशयाचे अनेक मीम्स सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.