मुंबई - दोन दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहते या सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला. वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी तो हे जग सोडून गेला म्हणून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सिद्धार्थ च्या इतर फॅन्सवरही दुःखाची कुऱ्हाड कोसळली आणि काहीजण तर आजारी पडले. त्यातीलच एक तरुण फॅन आहे जी सिद्धार्थच्या निधनाची बातमी ऐकल्यावर होणारे दुःख सहन न झाल्याने बेशुद्ध झाली आणि तिला दवाखान्यात हलविण्यात आले आणि ती अंशतः कोमात असल्याचे कळतेय.
फॅन अंशत: कोमात -
सिद्धार्थ शुक्ला याचे फॅन-फॉलोईंग खूप जास्त होते ज्यात प्रामुख्याने मुलींचा जास्त भरणा होता. यात काही नवल नव्हते कारण सिद्धार्थ अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्व, कमालीचा हँडसमनेस, उत्तम शरीरसौष्ठव, विनोदी स्वभाव यांचा मालिक होता आणि कमालीचा फेमसही होता. बिग बॉस १३ चा विजेता असलेल्या सिद्धार्थ चे त्याची ‘बीबी’-घरातील मैत्रीण शेहनाज गिल सोबत अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते आणि ते रिलेशनशिपमध्ये असल्याचेही बोलले जात होते. सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाजला इतका धक्का बसला की नेहमी बडबड करणारी ती पूर्णतः गप्प होती. सिद्धार्थ च्या इतर फॅन्सवरही दुःखाची कुऱ्हाड कोसळली आणि काहीजण तर आजारी पडले. त्यातीलच एक तरुण फॅन आहे जी सिद्धार्थच्या निधनाची बातमी ऐकल्यावर होणारे दुःख सहन न झाल्याने बेशुद्ध झाली आणि तिला इस्पितळात हलविण्यात आले आणि ती अंशतः कोमात असल्याचे कळतेय.
डॉक्टरांनी दिली माहिती -
सिद्धार्थच्या निधनाची बातमी ऐकून त्याच्या एका फॅनला चक्कर आली आणि त्या तरुणीला रुग्णालयात भरती करावे लागले आहे. ती कोमात गेली असल्याचे खुद्द डॉक्टरांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. डॉ. जयेश ठाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर एक चाहती बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडली. त्यानंतर डॉ ठाकर यांनी ट्विट करून सिद्धार्थच्या सर्व चाहत्यांना आपली स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्या तरुणीची प्रकृती गंभीर असून त्यांनी तिचा इस्पितळातील एक फोटो शेअर करत म्हटले आहे की, "मित्रांनो, तुमच्या कुटुंबीयांशी आणि मित्रांशी बोला आणि एकटे राहू नका, सिद्धार्थच्या एका फॅनला काल रात्री वॉशरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कृपया स्वतःची काळजी घ्या...आणि तिच्यासाठी प्रार्थना करा, असा आशय त्यांनी पोस्ट केलेल्या संदेशात आहे.
चाहत्यांनी शांत राहण्याचे डॉक्टरांचे आवाहन -
तसेच पुढील ट्विटमध्ये डॉ. जयेश ठाकर लिहितात (ढोबळ स्वरूपात) की, 'Get Well Soon. डॉक्टरांनी सांगितले आहे की, अति-ताणामुळे ती कोमात गेली असून तिची बुबुळं आणि हात-पाय प्रतिसाद देत नाहीयेत. मी सर्व फॅन्स आणि चाहत्यांना शांत राहण्याचा आणि अति-विचार न करण्याचा सल्ला देतोय. तसेच अशा परिस्थितीत, मला माहितीय की हे थोडे कठीण आहे तरीही, स्वतःचे मन दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करा आणि व्यवस्थित वागून सिद्धार्थ ला श्रद्धांजली द्या. ती लवकर बरी व्हावी यासाठी आपण तिच्यासाठी देवाकडे प्रार्थना करूया.'
भावना शेठ आणि पोलिसांत वाद -
सिद्धार्थ शुक्ला पंचतत्वात विलीन झाला आहे. त्याला शेवटचा निरोप देताना, चाहत्यांसह, स्टार्सने देखील भावूक झाले होते. सिद्धार्थसोबत काम केलेले प्रत्येक कलाकार सिद्धार्थला शेवटच्या वेळी पाहण्यासाठी उपस्थित होते. आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात भावना सेठ काही पोलिसांसोबत वाद घालताना दिसली. तिने आरोप केला आहे की पोलिसांनी तिचा पती अविनाशला कानशिलात लगावली. भावना सेठचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.
हेही वाचा - Video: सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार; शहनाझ गीलची प्रकृती बिघडली