मुंबई - जेव्हापासून गेहराइयाँचा ट्रेलर रिलीज झाला आहे, तेव्हापासून अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि दीपिका पदुकोणच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल प्रेक्षक प्रशंसा करीत आहेत. या चित्रपटातील आणखी एक नायिका अनन्या पांडेला सिध्दांतने दिलेल्या वागणूकीने त्याच्याबद्दलचा आदर वाढला आहे.
सोमवारी टीम गेहराइयाँ मुंबईत चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली. चित्रपटाचे प्रमोशन करताना स्टार कास्टने उबर-स्टाईलिश अॅपियरन्स केले. अनन्या आणि सिद्धांत आपापल्या पोशाखात खूपच स्टायलिश दिसत होते. पांढरा शर्ट, निळी डेनिम पॅन्ट आणि जॅकेटमध्ये सिद्धांत सुंदर दिसत होता. अनन्या ट्यूब टॉपमध्ये सुंदर दिसत होती ज्यामध्ये तिने ट्राउझर्स आणि हील्स घातली होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
जेव्हा दोघे फोटो काढण्यासाठी निघाले तेव्हा अनन्याला थंडी जाणवू लागली कारण जोरदार वारा होता आणि तिचा पोशाख तिला थंड हवामानापासून वाचवण्यास मदत करत नव्हता. सिद्धांतने वेळ न दवडता त्याचे जॅकेट काढले आणि अनन्याला ते घालण्यास मदत केली. त्याच्या गोड हावभावाने अनन्याला केवळ स्पर्शच झाला नाही तर चाहत्यांनीही त्याची शूर बाजू लक्षात घेतली आहे. त्याच्या या कृतीमुळे निश्चितच प्रेक्षकांची वाहवा त्याने मिळवली.
सिद्धांत अनन्याला त्याचे जॅकेट देतानाचा व्हिडिओ ऑनलाइन समोर आल्यानंतर लगेचच त्याने दाखवलेल्या औदर्याचे कौतुक करण्यास चाहत्यांनी सुरुवात केली.
दीपिका, सिद्धांत आणि अनन्या सोबतच गहराइयाँ या चित्रपटात धैर्य करवा, नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्या प्रमुख भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन शकुन बत्रा यांनी केले असून हा चित्रपट 11 फेब्रुवारी रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - बॉडिकॉन ड्रेसमधील दीपिका पदुकोणने चाहत्यांना केले घायाळ, पाहा फोटो