ETV Bharat / sitara

रियाला शवागरात प्रवेश दिल्याने मुंबई पोलीस, बीएमसीला राज्य मानवाधिकार आयोगाची नोटीस - सुशांतसिंह मृत्यू प्रकरण

सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर त्याचे पार्थिव जिथे ठेवले होते, त्या शवागरात रिया चक्रवर्ती गेली होती. याबाबत महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने (एसएचआरसी) मुंबई पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेला फटकारले आहे.

Rhea Chakraborty
रिया चक्रवर्ती
author img

By

Published : Aug 26, 2020, 3:08 PM IST

मुंबई - दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या शवगृहात जाण्याबद्दल महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने (एसएचआरसी) मुंबई पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेला फटकारले आहे. बुधवारी एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयोगानेही यासंदर्भात दोघांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. इतकेच नव्हे, तर एसएचआरसीने पोलीस आणि नागरी अधिकाऱ्यांनाही सोमवारपर्यंत या प्रकरणात त्यांचा सविस्तर उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

आयोगाचे कार्यवाह अध्यक्ष एमए सईद यांनी या प्रकरणाची वृत्तसंस्थेला पुष्टी केली आहे.

अधिकृत सूत्रांनी सांगितले की, १४ जून रोजी रिया चक्रवर्ती विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयाच्या शवागारात गेल्याचे व्हिडिओ आणि बातम्या आयोगाच्या उच्च अधिकाऱ्यांनी पाहिल्या आहेत. नंतर मृतदेहाच्या कुटूंबातील सदस्यांनाच शवगृहात जाण्याची परवानगी असल्याने आयोगाने कायदेशीर शाखेला याची चौकशी करण्याचे निर्देश दिले.

त्यानंतर कमिशनने रुग्णालयाच्या डीनला विचारले की, कोणत्या परिस्थितीत त्यांनी रियाला शवागारात जाण्याची परवानगी दिली आणि मृत अभिनेत्याचा मृतदेह पाहण्याची परवानगी दिली.

हा व्हिडिओ सोशल मीडिया आणि टेलिव्हिजनवर व्हायरल झाल्यामुळे कमिशनला त्याविषयी अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे आयोगाने यावर कारवाई सुरू केली आहे. मृताच्या कुटूंबाशिवाय इतर कोणासही शवागृहात जाण्याची परवानगी नसतानाही या प्रकरणात सामील असलेल्या लोकांना कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागू शकतो.

यासंदर्भात माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिस आणि बीएमसी अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा वृत्तसंस्थेने संपर्क साधला होता, परंतु अधिकाऱ्यांनी नकार दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.