मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या आगामी महिला-केंद्रित 'सुखी' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सुखी म्हणून स्वतःची झलक देत, शिल्पाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती क्लॅपबोर्ड धरून तिच्या चाहत्यांना सांगतेय की तिने चित्रपटाचा पहिला शॉट पूर्ण केला आहे.
"एक नवीन चित्रपट, एक नवीन पात्र, एक नवीन प्रवास: #SUKHEE. पहिले शूट पूर्ण झाले," असे शिल्पाने पोस्टला कॅप्शन दिले. अनेक चाहते आणि सेलिब्रिटी फॉलोअर्सनी कमेंट सेक्शनमध्ये शिल्पावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तिची धाकटी बहीण शमिता शेट्टीने तिला शुभेच्छा दिल्या आणि लिहिले, "ऑल द बेस्ट मुंकी," तर ज्येष्ठ अभिनेता अनिल कपूरने लिहिले, "ऑल द बेस्ट माय फ्रेंड."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
शिल्पा बुधवारी चित्रपटाच्या शूटिंगसाठी चंदीगडला रवाना झाली होती. एबंडंटिया एंटरटेनमेंट आणि टी-सीरिजने महिला-केंद्रित चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन सोनल जोशी करीत आहे. सोनल यांनी यापूर्वी धूम 3 आणि जब हॅरी मेट सेजल सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
शिल्पाने अलीकडेच विनोदी-ड्रामा 'हंगामा 2' द्वारे अनेक वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले होते. शिल्पा सध्या दिग्गज अभिनेते किरण खेर, रॅपर बादशाह आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्यासोबत इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये जज म्हणून दिसत आहे.
हेही वाचा - आजारी सबा आझादसाठी हृतिक रोशनच्या कुटुंबाने पाठवले जेवण