ETV Bharat / sitara

हिमाचल : शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा धर्मशाळा येथे एकत्र; चामुंडा देवी, ज्वालाजी मंदिराला दिली भेट

पती राजकुंद्राला जामीन मिळाल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी त्याच्यासोबत हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे दिसून आली. दोघांनी कुटुंबासहित चामुंडा देवी, ज्वालाजी मंदिर आणि त्यात असणाऱ्या पवित्र ज्योतींचे दर्शन घेतले.

Shilpa Shetty raj kundra visit Dharamshala
शिल्पा शेट्टी राज कुंद्री धर्मशाळा
author img

By

Published : Nov 9, 2021, 7:28 PM IST

Updated : Nov 9, 2021, 7:34 PM IST

धर्मशाळा (हिमाचल) - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकला होता. त्याला जामीन मिळाल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी त्याच्यासोबत हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे दिसून आली. दोघांनी कुटुंबासहित चामुंडा देवी, ज्वालाजी मंदिर आणि त्यात असणाऱ्या पवित्र ज्योतींचे दर्शन घेतले.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राबरोबर

हेही वाचा - अभिनेत्री पूनम पांडेच्या पतीला 3 दिवसांची पोलीस कोठडी

८ नोव्हेंबर रोजी शिल्पा आणि राजने त्यांच्या मुलांसह या मंदिरांमध्ये दर्शन घेतले. यावेळी शिल्पाने पिवळ्या रंगाचा ड्रेस तर, राज कुंद्राने पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. यावेळी या मंदिरांचे मुख्य पुजारी असणाऱ्या ओम व्यास यांनी त्यांच्याकडून विधिवत पूजा करून घेतली. यासोबतच शिल्पा आणि राजने नंदिकेश्वर धाम या मंदिरात शंकराची आराधना देखील केली. शिवाय या मंदिराचा संपूर्ण इतिहास देखील जाणून घेतला.

शिल्पाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या ट्रिपचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. मात्र, या फोटोंमध्ये राज दिसून आला नाही. शिल्पाने अनेक फॅन्ससोबत फोटोही काढले. शिल्पाने सांगितले की, तिला या मंदिरात येऊन खूपच समाधान वाटले. इथे नेहमी यायला जमले तर नक्कीच येईल.

शिल्पाने ज्वालामुखी देवीचे दर्शन घेतले. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेअर करताना रोजा सिनेमातील गाण्याच्या ओळी देखील लिहिल्या आहेत. तिने नंदिकेश्वरधाम श्री चामुंडा मंदिर येथे जाताना धर्मशाळाच्या रस्त्यांचे विविध व्हिडिओ शेअर केले. ती योगा विसरली नाही. मैक्लोडगंज येथील अतिशय सुंदर वातावरणात तिने योगाही केला. तिच्या या पोस्ट तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकरी कमेंट्स आणि लाईक्स करत आहेत.

हेही वाचा - ऐतिहासिक चित्रपट ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' चित्रित होणार मराठी आणि इंग्रजी मध्ये!

Last Updated : Nov 9, 2021, 7:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.