ETV Bharat / sitara

"माध्यमांचे वागणे गिधाडाप्रमाणे, जणू चेटकिणीची शिकार करताहेत" - रिया चक्रवर्तीला शिबानीचा पाठींबा

मीडिया गिधाडाप्रमाणे वागतोय, जणू काही चेटकिणीची शिकार करतोय, असे म्हणत अभिनेत्री शिबानी दांडेकरने रिया चक्रवर्तीच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेतलाय. तिने आपल्या सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहून रियाला पाठिंबा दर्शवलाय.

Shibani Dandekar
शिबानी दांडेकर
author img

By

Published : Sep 3, 2020, 1:00 PM IST

मुंबई - अभिनेत्री शिबानी दांडेकर हिने सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती हिला पाठिंबा दर्शविला आहे. रियाला मीडियाकडून मिळणारी वागणूक एखाद्या शिकारी गिधाडाप्रमाणे आहे. ज्या प्रकारच्या स्थितीतून ती आणि तिचं कुटुंब जात आहे, त्याची कल्पना करता येत नाही. शिबानीने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहून रियाला समर्थन दिले आहे.

शिबानीने लिहिलंय, "मी रियाला ती 16 वर्षांची असल्यापासून ओळखत आहे. एक धडपडणारी, सशक्त, जागरूक... अशी एक अद्भुत व्यक्ती आहे. गेल्या काही महिन्यांपासून मला दिसते आहे की तिची प्रतिमा अगदी उलट बनली आहे. कारण ती आणि तिचे कुटुंब अशा छळातून जात आहेत, ज्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही.

आम्ही पाहत आहोत की माध्यमे कशी गिधाडाप्रमाणे वागत आहेत, जणू एखाद्या चेटकिणीची शिकार करीत आहेत. एका निरागस कुटुंबावर आरोप करून त्यांना पूर्णपणे हतबल करुन तोडण्यासाठी त्रास दिला जात आहे. "

शिबानी म्हणाली की, सध्याच्या परिस्थितीचा परिणाम रियाच्या कुटुंबावर झाला आहे.

पुढे तिने लिहिलेल आहे, "त्यांचे मूलभूत मानवाधिकार देखील काढून घेण्यात आले आहेत, कारण मीडिया न्यायाधीश, ज्युरी आणि फाशी देणाऱ्याची भूमिका बजावत आहे. आम्ही पत्रकारितेचा मृत्यू आणि माणुसकीचे भयानक रूप पाहिले आहे. तिचा गुन्हा काय आहे? तिने एका मुलावर प्रेम केले आहे. त्याच्या वाईट दिवसांमध्ये त्याची काळजी घेतली, तिच्यासोबत टिकून राहण्यासाठी तो आपले आयुष्य जगला नाही आणि जेव्हा त्याने स्वतःच आपले आयुष्य संपवले तेव्हा तिला त्रास दिला जात आहे."

शिबानीने असेही लिहिले आहे की, "आम्ही काय झालो आहोत? मी स्वत: पाहिले आहे की तिच्या आईची तब्येत कशी बिघडली आहे, आणि तिच्या वडिलांवर त्याचा कसा परिणाम झाला आहे, ज्याने २० वर्षे देशाची सेवा केली आहे, तिचा भाऊ किती लवकर मोठा झाला आहे, आणि कशा प्रकारे त्याला मजबूत व्हावे लागले आहे." पोस्टमध्ये शिबानी हिने सुशांतला न्यायाची मागणी करताना रियाला साथ देण्याचे वचन दिले आहे.

तिने लिहिले, "रिया, तू सशक्त आहे आणि परिस्थितीनुसार मजबूत राहणारी आहेस. तू ज्या प्रकारची व्यक्ती आहेस त्यासाठी सत्य तुझ्यासोबत आहे. इथपर्यंतच्या लढाईसाठी तुझ्याबद्दल माझ्या मनात खूप प्रेम आणि आदर आहे. या सगळ्या स्थितीतून तुला जावे लागत आहे, याबद्दल मला वाईट वाटते. तुला अनेकांनी कमी लेखले, तुझ्यावर संशय घेतला, जेव्हा गरज होती तेव्हा तुला साथ दिली नाही याबद्दल मला वाईट वाटते.''

शेवटी शिबानीने लिहिले, "मला वाईट वाटते की आयुष्यात तू केलेल्या चांगल्या गोष्टी (सुशांतची काळजी घेणे) तुझ्या आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव ठरत आहे. मला वाईट वाटते. मी नेहमी तुझ्यासोबत असेन. जस्टीस फॉर रिया.''

इतर अनेक सेलिब्रिटींनीही शिबानीशी सहमती दर्शविली आहे.

अनुषा दांडेकरने लिहिलंय,"मी रडत आहे, आमच्या छोट्या मुलीसोबत हे लोक जे काही करीत आहे त्यामुळे मला दुःख होत आहे. ती आमची प्रेमळ बहिण आहे." डान्सर-अभिनेत्री लॉरेन गॉटगीब हिनेही या पोस्टबद्दल शिबानीचे आभार मानले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.