मुंबई: ख्यातनाम चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची पुणे येथील फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) सोसायटीचे अध्यक्ष आणि संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी या वृत्ताला दुजोरा देणारे ट्वीट केले : "प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रपट व्यक्तिमत्त्व शेखर कपूर यांना एफटीआयआय सोसायटीचे अध्यक्ष आणि एफटीआयआयच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले आहे. हे कळवताना आनंद होत आहे."
-
Happy to inform that renowned international film personality #ShekharKapur has been appointed as the President of FTII Society & Chairman of Governing Council of FTII.@narendramodi @shekharkapur pic.twitter.com/lARfoDW4b9
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) September 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Happy to inform that renowned international film personality #ShekharKapur has been appointed as the President of FTII Society & Chairman of Governing Council of FTII.@narendramodi @shekharkapur pic.twitter.com/lARfoDW4b9
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) September 29, 2020Happy to inform that renowned international film personality #ShekharKapur has been appointed as the President of FTII Society & Chairman of Governing Council of FTII.@narendramodi @shekharkapur pic.twitter.com/lARfoDW4b9
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) September 29, 2020
"शेखर कपूर, यांचा एक प्रचंड अनुभव आहे, तो संस्थेला अधिक उंचावर नेईल. मला खात्री आहे की, प्रत्येकजण त्याच्या नियुक्तीचे स्वागत करेल," असे जावडेकर यांनी म्हटले आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालयाने (फिल्म्स विंग) जारी केलेल्या आदेशानुसार आणि सचिव (फिल्म्स -२) सूरजित इंदू यांच्या स्वाक्षरीने, कपूर यांचा कार्यकाळ 20 मार्च 2023पर्यंत राहील. दिग्दर्शक शेखर कपूर यांनी हॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटविला आहे.
1983मध्ये त्यांनी मासूम चित्रपटाबरोबर चित्रपटनिर्माता म्हणून सुरुवात केली. नसfरुद्दीन शाह, शबाना आझमी आणि जुगल हंसराज यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट महत्वपूर्ण आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाला. श्रीदेवी, अनिल कपूर आणि अमरीश पुरी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 1987मध्ये प्रदर्शित झालेल्या मिस्टर इंडिया चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.
1994मध्ये बॅंडिट क्वीन, या फूलन देवी यांच्या हिट बायोपिकने आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली. ऑस्कर-नामांकित एलिझाबेथ या चित्रपटापासून (1998) त्यांनी हॉलिवूड दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी द फोर फेदर्स (2002) आणि एलिझाबेथ : द गोल्डन एज (2000) हे हॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. टूटे खिलोने, फलक, गवाही या हिंदी चित्रपटांसह उडान ही लोकप्रिय टीव्ही मालिकाही बनवली.