ETV Bharat / sitara

स्वतःवर शंका ही अशी गोष्ट आहे ज्यातून प्रत्येक कलाकार जातो - मनोज बाजपेयी

दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या अभिनेता मनोज वाजपेयी याने आजही त्याला स्वतःवर संशय असल्याचे सांगितले आहे. यातून प्रत्येक कलाकाराला रोज जावे लागत असल्याचे तो म्हणाला.

author img

By

Published : Oct 12, 2020, 6:48 PM IST

Manoj Bajpayee
मनोज बाजपेयी

मुंबई - अभिनेता मनोज बाजपेयी एक हरहुन्नरी प्रतिभावंत कलाकार म्हणून ओळखला जातो. दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला हा अभिनेता दीर्घकाळ मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडत आला आहे. आजही स्वतःवर संशय असल्याचा खुलासा मनोजने केला आहे.

मनोजने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, "स्वतःबद्दल नेहमीच एक शंका असते. अभिनय करणे ही एक अतिशय कठीण कला आहे. हे एक असे शिल्प आहे जे आपल्याला कधीही आरामदायी होणे किंवा स्वत: बद्दल आत्मविश्वास वाटू देत नाही. ही एक अशाी गोष्ट आहे जी आपण नेहमी शिकत असतो.''

तो पुढे म्हणाला, "आपण यात काहीही चुकीचे करू शकत नाही. ही सतत शिकण्याची प्रक्रिया आहे. आत्मविश्वास अशी गोष्ट आहे ज्यातून प्रत्येकजण दररोज जातो. मीदेखील बाकीच्यापेक्षा वेगळा नाही."

मनोज सध्या त्याच्या 'बंबई में का बा' या रॅप गाण्याची प्रशंसा करत आहे. या रॅपने देशातील स्थलांतरित कामगारांच्या कोंडीवर प्रकाश टाकला आहे. 9 सप्टेंबर रोजीहे गाणे प्रसिद्ध झाल्यापासून त्याचे चांगलेच कौतुक होत आहे.

चित्रपटांविषयी बोलायचे तर तो आता अभिषेक शर्माच्या ‘सूरज पे मंगल भारी’ या चित्रपटात दिलजित दुसंज आणि फातिमा सना शेख यांच्यासह दिसणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.