ETV Bharat / sitara

'काश्मीर फाइल्स'च्या स्क्रीनिंगसाठी राजस्थानच्या कोटामध्ये कलम 144 लागू - काश्मीर फाइल्स स्क्रीनिंग

सण आणि 'द काश्मीर फाइल्स'च्या स्क्रीनिंगच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मंगळवार २२ मार्च ते 21 एप्रिलपर्यंत कोटा राजस्थानमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.

काश्मीर फाइल्स
काश्मीर फाइल्स
author img

By

Published : Mar 22, 2022, 3:32 PM IST

जयपूर - आगामी सण आणि 'द काश्मीर फाइल्स'च्या स्क्रीनिंगच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मंगळवार २२ मार्च ते 21 एप्रिलपर्यंत कोटा राजस्थानमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. कोटा जिल्हाधिकारी राजकुमार सिंह यांनी जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, जिल्ह्यात 22 मार्च रोजी सकाळी 6 ते 21 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत कलम 144 लागू राहील.

सोमवारी जारी केलेल्या परिपत्रकात या कालावधीत मेळावे, निदर्शने आणि रोड मार्च यावर बंदी असेल, असे म्हटले आहे. हा आदेश सरकारी कार्यक्रम कोविड लसीकरण इत्यादींना लागू होणार नाही.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या आदेशात पुढे म्हटले आहे की, सोशल मीडियाद्वारे अनावश्यक, त्रासदायक तथ्य पोस्ट करणे आणि प्रसारित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी कलम १८८ अन्वये कारवाई केली जाईल.

दरम्यान, 'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना टॅग करत राईट ऑफ जस्टिस या हॅशटॅगवरील चित्रपटामुळे राज्यात लोकशाहीची तोडफोड होत असेल, तर आपण न्यायासाठी काय केले पाहिजे? असे ट्विट केले आहे.

त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही टॅग केले आणि म्हटलंय की प्रिय अशोक गेहलोत जी, दहशतवाद्यांची एकमेव शक्ती आहे की ते भीती निर्माण करतात आणि आम्ही घाबरतो.

त्यांचा पुढचा संदेश प्रेक्षकांसाठी होता, त्यात लिहिलंय, प्रिय 'द काश्मीर फाइल्स'च्या प्रेक्षकांनो, तुमच्यासाठी न्याय करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा - सुष्मिता सेनसोबत पुन्हा दिसला रोहमन शॉल, कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी चाहत्यांची गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.