ETV Bharat / sitara

सारा अलीने आई वडिलांची 'नाक काट दी मैने' म्हणत मागितली माफी - सारा अली खानच्या नाकाला दुखापत

सारा अली खान नेहमीच तिचे प्रसिद्ध नॉक-नॉक विनोद इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत असते, मात्र यावेळी हा व्हिडिओ फनी नाही. साराने आपल्या आई वडिलांची आणि भाऊ इब्राहिमची 'नाक काट दी मैने' म्हणत माफी मागितली.

Sara Ali Khan
सारा अली खान
author img

By

Published : Aug 3, 2021, 8:10 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने तिच्या नाकाला दुखापत झाल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या इन्स्टाग्राममधील पोस्टमध्ये तिच्या नाकाला जखम झालेली दिसत आहे परंतु दुखापतीमुळे तिने आपली विनोदबुध्दी हरवू दिलेली नाही.

अभिनेत्री सारा अली खानने तिच्या आई -वडिलांची आणि इब्राहिमची 'नाक काट दी मैने' म्हणत माफी मागितली. मंगळवारी साराने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यात ती तिचे नाक टिशूने झाकताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना साराने लिहिले, "सॉरी अम्मा अब्बा इग्गी 🙏🏻 नाक काट दी मैने".

व्हिडिओमध्ये, साराने ती कशामुळे जखमी झाले याचा खुलासा केलेला नाही. तिला ही जखम नेमकी कशामुळे झाली अशा प्रश्न तिला तिचे चाहते काळजीने विचारत आहेत.

चित्रपटाच्या पातळीवर विचार करता अलीकडे अभिनेता वरुण धवन सोबत ओटीटी-रिलीज झालेल्या 'कुली नंबर 1' चित्रपटात सारा दिसली होती. तिने आगामी ‘अतरंगी रे’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, धनुष आणि निमरत कौर यांची मुख्य भूमिका आहेत आणि दिग्दर्शन ए.आनंद एल. राय यांनी केले आहे. अतरंगी रे चित्रपट हिमांशु शर्मा यांनी लिहिला आहे. तसेच सारा अली आगामी ‘इमॉर्टल अश्वत्थामा’ या आदित्य धरच्या साय-फाय चित्रपटात विकी कौशलसोबत काम करणार आहे. यामध्ये तिचे काही अॅक्शन सीन्सही असल्याचे समजते.

हेही वाचा - हनी सिंगच्या विरोधात पत्नीने दाखल केला घरगुती हिंसा, मानसिक छळ केल्याचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.