मुंबई - बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'सुलतान' चित्रपटाच्या प्रदर्शनाला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बास जफरने आपल्या सोशल मीडियावरून काही फोटो शेअर केले आहेत.
सुलतान चित्रपटाला ३ वर्ष पूर्ण, असं कॅप्शन देत प्रेक्षकांनी चित्रपटाला दिलेल्या प्रेमाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. अली अब्बास जफरच्या या चित्रपटालाच तुफान प्रतिसाद मिळाला नाही, तर यातील बेबी को बेस पसंद है आणि जग घुमिया या गाण्यांनाही प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं.
-
Three years to @SultanTheMovie @yrf @BeingSalmanKhan @AnushkaSharma ... thank you for the all the love . pic.twitter.com/uOKhxEnWJg
— ali abbas zafar (@aliabbaszafar) July 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Three years to @SultanTheMovie @yrf @BeingSalmanKhan @AnushkaSharma ... thank you for the all the love . pic.twitter.com/uOKhxEnWJg
— ali abbas zafar (@aliabbaszafar) July 6, 2019Three years to @SultanTheMovie @yrf @BeingSalmanKhan @AnushkaSharma ... thank you for the all the love . pic.twitter.com/uOKhxEnWJg
— ali abbas zafar (@aliabbaszafar) July 6, 2019
आदित्य चोप्राचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये सलमानने कुस्तीपटूची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी त्याने बरीच मेहनत घेतल्याचंही पाहायला मिळालं होतं. त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केलं होतं.