मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा आगामी ''राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई" चित्रपटाच्या रिलीजला आता अजून विलंब होणार नाही. या चित्रपटाचे निर्मात्यांनी हायब्रीड रिलीज करायचे ठरवले आहे. यापूर्वी २०२० च्या ईदसाठी याचे नियोजन करण्यात आले होते.
कोविडची दुसरी लाट पसरली आहे आणि चित्रपट प्रदर्शनाचा व्यवसाय पुन्हा एकदा संपूर्ण भारतभर ठप्प झालाय. कोरोना साथीचा विपरीत परिणाम चित्रपट उद्योगावर झाला आहे. अशावेळी ''राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई" चित्रपटाचे प्रदर्शन ठरलेल्या दिवशी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
-
The perfect Eid celebration!💥 #Radhe: Your Most Wanted Bhai, releasing simultaneously on multiple platforms worldwide.#RadheThisEid
— Salman Khan Films (@SKFilmsOfficial) April 21, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
@BeingSalmanKhan @bindasbhidu @DishPatani @RandeepHooda @PDdancing @ZeeStudios_ @SohailKhan @atulreellife @reellifeprodn @ZeeMusicCompany pic.twitter.com/TzD3s3eLDi
">The perfect Eid celebration!💥 #Radhe: Your Most Wanted Bhai, releasing simultaneously on multiple platforms worldwide.#RadheThisEid
— Salman Khan Films (@SKFilmsOfficial) April 21, 2021
@BeingSalmanKhan @bindasbhidu @DishPatani @RandeepHooda @PDdancing @ZeeStudios_ @SohailKhan @atulreellife @reellifeprodn @ZeeMusicCompany pic.twitter.com/TzD3s3eLDiThe perfect Eid celebration!💥 #Radhe: Your Most Wanted Bhai, releasing simultaneously on multiple platforms worldwide.#RadheThisEid
— Salman Khan Films (@SKFilmsOfficial) April 21, 2021
@BeingSalmanKhan @bindasbhidu @DishPatani @RandeepHooda @PDdancing @ZeeStudios_ @SohailKhan @atulreellife @reellifeprodn @ZeeMusicCompany pic.twitter.com/TzD3s3eLDi
बर्याच विलंबानंतर १३ मे रोजी ''राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई" हा अॅक्शन-थ्रिलर रिलीज होणार आहे. स्टुडिओ पार्टनर झी यांच्यासमवेत या चित्रपटाची सहनिर्मिती करणार्या सलमानने हायब्रीड रिलीज मॉडेलची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हा चित्रपट एकाच दिवशी थिएटर आणि डिजिटल जगात रिलीज होईल.
सलमान खान फिल्म्स आणि झी स्टुडिओच्या निवेदनात म्हटले आहे की, “कोविड प्रोटोकॉलनुसार सुरू असलेल्या सर्व भारतीय राज्यांतील चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट उपलब्ध असेल.”
"परफेक्ट ईद सेलिब्रेशन! # ''राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई" जगभरातील अनेक प्लॅटफॉर्मवर एकाचवेळी रिलीज होत आहे'', असे सलमान खान फिल्म्सच्या अधिकृत हँडलने ट्विट केले आहे.
हा चित्रपट ZEE5 वर ZEE5 चा पे-व्ह्यू- सर्व्हिस ZEEPlex वर एकाच वेळी प्रदर्शित होईल. तसेच डिश, D2H, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटल टीव्हीसह सर्व आघाडीच्या ऑपरेटरवर प्रदर्शित होईल. सरकारने जारी केलेल्या कोविड प्रोटोकॉलचे पालन करून राधे जगभरातील चित्रपटगृहांमध्येही प्रदर्शित होईल.
सध्याच्या अनिश्चिततेमुळे अनेक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तारखेपासून माघार घेत आहेत. परंतु ''राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई" चित्रपटाने ठरलेल्या तारखेला पुढे जायचे ठरवले आहे.
हेही वाचा - ‘टाइम पास ३’ च्या हक्कांवरून रवी जाधव आणि मौर्य फिल्म अँड एंटरटेन्मेन्टमध्ये खडाजंगी!