ETV Bharat / sitara

कोरोनामुळे मिळालेल्या वेळेचा सलमान खानने 'असा' केला उपयोग, पाहा व्हिडिओ - Salman khan upcoming film

सलमान खानच्या या कलेचे चाहते देखील कौतुक करत आहेत. काही तासातच या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले आहेत.

Salman khan uses to stay at Home time For Sketching
कोरोनामुळे मिळालेल्या वेळेचा सलमान खानने 'असा' केला उपयोग, पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Mar 19, 2020, 9:35 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूमुळे चित्रपट क्षेत्रातील बरीच कामे थांबवण्यात आली आहेत. काही चित्रपटांचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे. तर, काही चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा बदलवण्यात आल्या आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने बरेच कलाकार घरीच वेळ घालवत आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान देखील घरीच मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत त्याच्या छंदासाठी वेळ देत आहे. त्याला चित्रकलेची आवड असल्याने त्याने मिळालेल्या वेळेत एक स्केच तयार केले आहे.

सलमान खानने तयार केलेल्या या स्केचचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याचे हे स्केच पाहून अभिनयासोबतच त्याची चित्रकला देखील उत्कृष्ट असल्याचे दिसून येते.

हेही वाचा -'कोरोना गो', ढिंचॅक पूजानेही तयार केलं गाणं

सलमान खानच्या या कलेचे चाहते देखील कौतुक करत आहेत. काही तासातच या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच सलमानने एक फोटो शेअर करुन कोरोनापासून आपला बचाव करण्याचे आवाहन चाहत्यांना केले होते. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी हात मिळवणी न करता दुरूनच 'नमस्कार' आणि 'सलाम' करा, असे त्याने फोटोतून सांगितले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याने अमेरिका आणि कॅनडामधील एक कार्यक्रम देखील रद्द केला होता.

हेही वाचा -अमिताभ यांच्या हातावर क्वारंटाईनचा स्टँप; त्यांनी का शेअर केला फोटो?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.