मुंबई - सुपरस्टार सलमान खान त्याचा 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमान खानला विषारी सापाने दंश केल्याचे समजताच सलमानचे लाखो चाहते दु:खी झाले. यावर अभिनेत्याने मीडियाला सांगितले की, जेव्हा तो पनवेलच्या फार्म हाऊसवर पोहोचला तेव्हा फार्म हाऊसच्या एका खोलीत साप घुसला होता. सलमान त्या सापाला बाहेर काढून सोडणार होता, तेव्हा सापाने त्याचा चावा घेतला. सध्या सलमान खान पूर्णपणे निरोगी आहे. त्याने वांद्रे येथील घरी आणि फार्म हाऊसवर केक कापून त्यांच्या प्रियजनांसोबत 56 वा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पनवेल फार्महाऊसवर पाहुण्यांचे स्वागत केले. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
सलमान खानला शनिवारी रात्री पनवेलजवळील त्याच्या फार्महाऊसवर एका विषारी सापाने चावा घेतला होता. त्यानंतर त्याला तातडीने नवी मुंबईतील कामोठे येथील रुग्णालयात नेण्यात आले आणि रविवारी सकाळी त्याला घरी सोडण्यात आले.
सुपरस्टार सलमान खानला बिनविषारी साप चावल्यानंतर त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी अभिनेत्याची प्रकृती स्थिर असून तो वेगाने बरा होत असल्याची पुष्टी केली आहे. 56 वर्षीय अभिनेत्यावर उपचार करणारे डॉक्टर कुलदीप सालगोत्रा म्हणाले, "डॉक्टरांची दोन टीम सलमान खानसोबत असून त्याची प्रकृती ठीक आहे."
सलमान खान त्याचा 56 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर आहे. गेल्या वर्षीही सलमानने पनवेलच्या फार्महाऊसवर वाढदिवस साजरा केला होता.
हेही वाचा - 2022 मध्ये या 10 चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर राज्य करणार सलमान खान